Bigg Boss Marathi 4: याला जर एवढं कळत असतं तर.. अपूर्वाने आरोहची सगळीच काढली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apurva nemlekar slams aroh velankar in nomination task Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: याला जर एवढं कळत असतं तर.. अपूर्वाने आरोहची सगळीच काढली..

apurva nemlekar and aroh welankar: सध्या बिग बॉस मराठी अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. कालच्या एलिमिनेशन राऊंड मध्ये स्पर्धक सदस्यांना आणि प्रेक्षकांना खुप मोठा धक्का बसला. कारण एक नाहीतर डबल एलिमिनेशन करण्यात आले. ज्यामध्ये विकास सावंत आणि अमृता देशमुखला घराबाहेर पडावे लागले. आता या आठवड्यात सदस्यांना कोणते सरप्राईझ मिळणार ? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? हे आजच्या भागात कळणार आहे.

(apurva nemlekar slams aroh velankar in nomination task Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: कौतुकानं घात केला!पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख घराबाहेर..

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसून येत आहे आज घरात पार पडणार आहे "TIMES UP" हे नॉमिनेशन कार्य ! या कार्यात जो सदस्य आपल्याला घरामध्ये राहण्यास पात्र वाटत नाही त्यांच्या नावाच्या घड्याळावर हातोडा घालायचा आहे. यावेळी अपूर्वा आरोह वेलणकरच नाव नॉमिनेशन साठी घेते आणि म्हणते, 'त्याला जर एवढं कळलं असतं तर कदाचित त्याच्या सिझन मध्येच तो जिंकला असता... गो बॅक सायमन..' म्हणत ती हातोडा मारते.

यावेळी किरण माने प्रसाद जवादेला नॉमिनेट करतो. किरण म्हणतो, 'बिग बॉस मधला ९० टक्के वेळ सोफ्यावर शांतपणे बसून वाया घालवला आहेस.. त्यामुळे तू आता बाहेर जायला हवं.. असं मला वाटतं..' त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? ही आजच्या भागात कळणार आहे.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi