AR Rahman: 'तू कोण बोलणारी?' ए.आर. रहमाननं नेहा कक्करला सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AR Rahman

AR Rahman: 'तू कोण बोलणारी?' ए.आर. रहमाननं नेहा कक्करला सुनावलं

Neha Kakkar: देशात नव्हे तर ज्याच्या संगीताचे चाहते आहेत अशा ए आर रहमानच्या संगीताची गोष्टच वेगळी आहे. संगीतासाठी ऑस्कर मिळवल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. मणिरत्नम यांच्या रोजापासून रहमानच्या प्रवासाला सुरुवात झाली आज तो सातासमुद्रापार पोहचला आहे. सध्या रहमान हा त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्यानं प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला परखड शब्दांत उत्तर दिलं आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर ही तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे.

सोशल मीडियावर फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील वाद हा आता अनेकांच्या नजरेत आला आहे. त्यांनी वैयक्तिक पातळीवर एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासगळ्यात परिस्थितीत ए आर रहमान यांनी रिमिक्स कल्चरवर परखड प्रतिक्रिया दिली आहे. रहमान म्हणतो, जे रिमिक्स सुरु आहे त्याची मला कीव येतो. त्याच्या नावाखाली संगीताची हानी होते आहे. जे कानावर येते ते ऐकूशी वाटत नाही. जो कुणी ते संगीत तयार करतो त्याची मानसिकताही विकृत होते असे रहमान म्हणाला होता.

नेहा कक्करनं काही दिवसांपासून बॉलीवूडमधील जे रिमिक्स कल्चर आहे त्य़ाच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासगळ्यात रहमाननं देखील इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नेहाचे नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. हे जे कुणी रिमिक्सवर बोलत आहे ते सगळे व्यर्थ आहे. लोकं मलाही विचारतात तुम्ही कोण आहात पुन्हा त्याला रिइॅमेजिन करणारे, आता त्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडतो.

हेही वाचा: Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

रहमान यांनी सध्याच्या नव्या पिढीच्या संगीत ऐकण्याबद्दलच्या सवयीवर बोट ठेवले आहे. त्यांचा रिमिक्स ऐकण्याकडे ओढा अधिक आहे. हे मी समजू शकतो. मात्र जे कुणी आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या संगीतकारांना मान देत नाही त्यांना मी माफ करणार नाही. ते कोण होतात आपल्याला सांगणारे असे मला सांगायचे आहे. रहमान यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Madhuri Dixit: माधुरीला नाही म्हणायचं नसतं!