AR Rahman : 'आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...' जीवन संपविण्याचा निर्णय घेणाऱ्यांना रहमाननं दिला मोठा सल्ला!

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या कंपोझिंगमुळे ओळखल्या जाणाऱ्या ए आऱ रहमानची गोष्टच वेगळी आहे.
AR Rahman Music Director Life Lesson
AR Rahman Music Director Life Lessonesakal
Updated on

AR Rahman Music Director Life Lesson : बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या कंपोझिंगमुळे ओळखल्या जाणाऱ्या ए आऱ रहमानची गोष्टच वेगळी आहे. संगीत क्षेत्रात भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या रहमानचा चाहतावर्ग केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ रहमाननं चाहत्यांना अवीट सुरांची मेजवानी आपल्या गाण्यांमधून दिली आहे.

रहमान हा जसा त्याच्या म्युझिक क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात तसेच ते त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी देखील परिचित आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या रहमान यांनी आता सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींवर गांभीर्यानं भाष्य केले आहे. रोजचं जगणं इतकं खडतर होत आहे की, अनेकदा हाती अपयश आलं की, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.त्यावर रहमान यांनी स्पष्टपणे नकारात्मक विचार करणाऱ्यांना सुनावले आहे.

रहमाननं यावेळी आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा दाखला दिला आहे. तुम्ही ज्यावेळी नकारात्मक परिस्थितीत असाल अशावेळी तो काळ तुमची परीक्षा बघणारा आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक डार्क पॅच येतोच. त्यामुळे त्याला सामोरं जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं असून त्यात रहमान यांनी तरुणाईला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सांगण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड युनियन डिबेटिंग सोसायटीच्या विद्यार्थ्यांसमोर रहमान बोलत होते. त्यावेळी आय़ुष्यातील सकारात्मकता आणि आपण यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात अनेक खडतर गोष्टींचा सामना केला. मलाही खूप नकारात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागलं पण माझ्या आईनं दिलेली शिकवण मला नेहमीच उपयोगी पडली. तिनं मला जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं अंधारुन येतं तेव्हा काय करायचं हे सांगितलं होतं.

मी जेव्हा तरुण होतो तेव्हा माझ्याही मनात आत्महत्येचे विचार आले होते. ती परिस्थिती देखील तशीच होती. मला खूप अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं की, जर तू स्वतासाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार करशील तेव्हा तुझ्या मनात असे विचार येणार नाही. तेव्हा दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार कर..., पुढे हाच विचार माझ्या जगण्याला बळ देऊन गेला. असे रहमान यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com