esakal | आर्चीचा साडीमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय
sakal

बोलून बातमी शोधा

Archie photo in saree is a topic of discussion

कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुद्धा खूप कमी दिवसात स्टार होणं म्हणजे काय? हे अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्चीने सिद्ध करुन दाखवलं.

आर्चीचा साडीमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुद्धा खूप कमी दिवसात स्टार होणं म्हणजे काय? हे अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्चीने सिद्ध करुन दाखवलं. नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ सिनेमा प्रसिद्ध झाला अन्‌ आर्ची थेट नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत जाऊन बसली. त्यामुळे तिचे चाहते देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत.

सोशल मीडियावर देखील सध्या आर्ची खूप अॅक्टिव्ह आहे. रविवारी तिने मराठमोळ्या लूकमधील एक फोटो फेसबुकवर टाकला आहे. त्याला तिच्या चाहत्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. ती इंस्टाग्रामवर देखील आहे.

सोशल मीडियावर आर्ची सतत आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. त्यातूनच तिने आपल्या फेसबुक वॉलवर एक साडी परिधान केलेला सुंदर फोटो शेअर केला आहे. सहा तासात तिला हजारो लाईक आल्या आहेत. कमेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आल्या असून अनेकांनी तो फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचे काही नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैराट हा तिचा पहिला सिनेमा होता. आकश ठोसर अर्थात परशाबरोबर तिचा हा चित्रपट होता. खूप कमी कालावधीत ती प्रसिद्ध झाली होती. आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. नवनवीन फोटो शेअर करत असल्याने ती नेहमी चर्चेत येत आहे. ती तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. आता मराठमोळ साडीतला तिने फोटो शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरुला एकाच चित्रपटाने एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली. तीने ‘मेकअप’ या चित्रपटतही काम केले होते. आपल्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने अनेकांना ती घायाळ करत आहे.

loading image