मुंबईत कतरिना-विकीचं पुढच्या आठवड्यात लग्न? |Vicky-Katrina | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Vicky Kaushal and Katrina Kaif

मुंबईत कतरिना-विकीचं पुढच्या आठवड्यात लग्न?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. निमंत्रण पत्रिकेपासून ते मेहंदी समारंभापर्यंत सर्व कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. आता त्यांच्या लग्नाचा प्लॅनदेखील समोर आला आहे. विकीने लग्नासाठी पुढच्याच आठवड्याचा मुहूर्त पक्का केल्याचं म्हटलं जात आहे.

राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये कतरिना आणि विकी यांच्या भव्य लग्नाची तयारी सुरू आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस हॉटेलमध्ये त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहेत. मात्र याआधी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम आधीच राजस्थानमध्ये पोहोचली आहे. कतरिना आणि विकी लग्नाविषयी स्वतः काही सांगत नसले तरी त्यांची टीम लग्नाच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचबरोबर अनेक इव्हेंट कंपन्या या व्हीआयपी लग्नाची व्यवस्था करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र इव्हेंट कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: राजकुमार-पत्रलेखाच्या लग्नाचा अल्बम

तत्पूर्वी, कतरिना तिच्या आगामी चित्रपटात म्हणजेच 'टायगर ३'च्या क्रेडिटमध्ये तिचं नाव बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, याबद्दल अजून कतरिनाकडून काही समजलं नाहीये. पण जर तिने तिचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला, तर पोस्टर आणि टीझरमध्ये तिचं नवीन नाव 'कतरिना कैफ कौशल' हे असू शकतं.

loading image
go to top