Silvina Luna: सर्जरी करायला गेली अन्... लोकप्रिय अभिनेत्रीने जीव गमावला

लोकप्रिय अभिनेत्री सिल्विना लुनाने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Argentine Actor Silvina Luna Dies After Plastic Surgery Goes Wrong
Argentine Actor Silvina Luna Dies After Plastic Surgery Goes Wrong SAKAL

Silvina Luna Death News: अर्जेंटिनाची अभिनेत्री सिल्विना लुना हिचा मृत्यू झाला. प्लॅस्टिक सर्जरी चुकल्याने सिल्विनाला तिचा जीव गमवावा लागला. सिल्विना लुना ही माजी टीव्ही अँकर आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार होती.

सिल्विना लुना, एक प्रसिद्ध अर्जेंटाइन अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही अँकर होती. प्लास्टिक सर्जरीमुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्येशी ती दीर्घकाळ झुंज देत होती. पण ही झुंज अपयशी ठरली आणि ती मरण पावली. याशिवाय 43 वर्षीय सिल्विना 2011 पासून किडनी निकामी झाल्यामुळे त्रस्त होते.

Argentine Actor Silvina Luna Dies After Plastic Surgery Goes Wrong
Subhedar: सुभेदारने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा रोवला, बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई

सिल्विनाचे वकील, फर्नांडो बरलांडो यांनी तिच्या मृत्यूच्या वृत्ताला पुष्टी दिली आणि सांगितले की, डॉक्टरांनी तिच्या जीवनाची काही शाश्वती नाही असे सांगितल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला लाइफ सपोर्टपासून डिस्कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युनोस आयर्स टाईम्सच्या मते, सिल्विनाचा इतक्या लहान वयात झालेला मृत्यू धक्कादायक आहे परंतु यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. लुनाला अनेक वर्षांपासून आरोग्याच्या गंभीर समस्यांनी ग्रासले असल्याने ती सतत हॉस्पीटलमध्ये ये - जा करत होती.

तिच्या आरोग्याच्या जवळपास सर्व समस्या काही वर्षांपूर्वी केलेल्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या शरीरात विषारी पदार्थ टाकल्यामुळे उद्भवल्या आहेत. यामुळे अनिबल लोटोकी या डॉक्टरवर चुकीची सर्जरी केल्याने खटला दाखल करण्यात आला आहे.

Argentine Actor Silvina Luna Dies After Plastic Surgery Goes Wrong
Mansi Mohile: काहे दिया परदेस फेम अभिनेत्री मानसी झाली आई! पोस्ट शेयर करत दिली गोड बातमी

लूना या माजी रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती आणि तिचे आयुष्य टिकवण्यासाठी आठवड्यातून तिला प्रत्येकी चार तास चालणारी तीन डायलिसिस सत्रे करावी लागत असत.

प्लॅस्टिक सर्जरी दरम्यान गुंतागुंतीमुळे होणारे मृत्यू सामान्यतः दुर्मिळ मानले जातात. तथापि, ही समज असूनही, अलिकडच्या वर्षांत अशा अनेक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत

या वर्षी एप्रिल महिन्यात, क्रिस्टीना अॅश्टेन गौरकानी, एक लोकप्रिय ओन्ली फॅन्स मॉडेलचा प्लास्टिक सर्जरी प्रक्रियेनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली. ती 34 वर्षांची होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com