
अरिजित सिंगला मातृशोक; कोरोनामुळे निधन
प्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या Arijit Singh आईचे कोरोनाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून कोलकातामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज (गुरुवार, २० मे) सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरिजितच्या आईला रक्ताची गरज असल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर लिहिली होती. (Arijit Singh mother dies of Covid 19 in Kolkata)
'अरिजित सिंगच्या आईसाठी A- या रक्ताची खूप गरज आहे. त्यांना अम्री ढाकुरियामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आजच तातडीने रक्ताची गरज आहे', अशी पोस्ट तिने लिहिली होती. स्वस्तिकाच्या या पोस्टवर अनेकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्ती केली आणि तिच्याकडून संपर्क क्रमांक मागितला होता. मात्र अरिजितच्या आईच्या प्रकृतीविषयी फारशी माहिती मिळाली नव्हती.
अरिजितने २००५ मध्ये 'फेम गुरूकुल' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत करिअरची सुरुवात केली. मात्र 'आशिकी २'मधल्या 'तुम ही हो' या गाण्यानंतर त्याला खरी ओळख मिळाली. आजवर त्याने बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत.
Web Title: Arijit Singh Mother Dies Of Covid 19 In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..