esakal | अर्जुनने कपूरने केली 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor Donates In PM Care Fund And CM Relief Fund to fight against Corona

अर्जुनने कपूरने केली 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत 

अर्जुनने कपूरने केली 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी अनेक नामवंत चेहरे समोर येत आहेत. यामध्ये आतापर्यंत अभिनेता शाहरूख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंह, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपीका पादुकोण सारख्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. या साखळीमध्ये आता अभिनेता अर्जुन कपूरचं नाव पुढे आलं आहे.

अर्जुन कपूरने कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी गरजूंना मदत म्हणून 'पीएम केयर फंड' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी मदत केली आहे. याशिवाय त्याने आणखी तीन संस्थांना देखील मदत केली आहे. 'गिव्ह इंडिया', 'द विशिंग फॅक्टरी', 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' या तीन संस्थांना त्याने मदत केली आहे. याबाबतची माहिती अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, 'आपला देश सध्या संकटात अडकला आहे. आणि देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या देशातील बंधू-भगिनींची मदत केली पाहिजे.

मी माझ्या परिने देशाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मी 'पीएम केयर फंड' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी मदत करत आहे. याशिवाय 'गिव्ह इंडिया' या संस्थेला मदत करत आहे. जी संस्था हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी आणि ज्यांचे या लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली आहे त्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर मी 'द विशिंग फॅक्टरी' आणि 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' यांनाही मदत करत आहे. आपण सर्व एकत्र येऊन या कोरोना विषाणूशी लढू शकतो. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्हीही पुढे या आणि तुम्हाला जमेल तितकी मदत करा.' अशी पोस्ट शेअर करत त्याने इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने मदत केलेल्या रक्कमेचा खुलासा केलेला नाही. अर्जुनने घेतलेल्या पुढाकाराने चाहते त्याची स्तुती करत आहेत.