अर्जुन-मलायकाचा हा फोटो होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

बॉलीवु़ड अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अर्जुन त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराला किस करताना दिसत आहे.

बॉलीवु़ड अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अर्जुन त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराला किस करताना दिसत आहे.
बॉलीवुडची 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोराने आज आपला वाढदिवस साजरा केला. आज रात्री 12 वाजेपासून बॉलीवुड सेलिब्रेटींनी तिला सोशल मी़डियावर शुभेच्छा दिल्या आहेत. यात अर्जुन कपूर मागे कसा राहील? अर्जुने देखील मलायकाचा वाढदिवस स्पेशल पद्धतीने साजरा केला आहे. 

अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलीवुड अभिनेता अर्जुन कपूर यांची रिलेशनशीप कायम चर्चेत असलेला विषय असतो. त्यांनी तसे अनेकवेळा  सार्वजनिकरित्या कबुल देखिल केले आहे. त्यामुळे हे हॉट कपल नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. आता अर्जुन कपूरने मलायका सोबतचा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. हा फोटो इटलीतील मिलानमधील असल्याचं फोटोतील लोकेशनवरून लक्षात येतं. या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक सेलिब्रेटींनीही उपस्थिती लावली असल्याचं फोटोवरून दिसतंय. याविषयी मलायका म्हणते की, गेल्या 5-6 वर्षापासून तिने वाढदिवस साजरा नव्हता केला. तर हा त्यानंतर हा वाढदिवस स्पेशल आहे म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arjun kapoor malayaka arora viral photo of instagram