Arjun Kapoor : 'माझी कुणाशीही स्पर्धा नाही, मी कधीही...' असं काय बोलून गेला अर्जून?

अर्जुननं एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत.
arjun kapoor latest viral news
arjun kapoor latest viral newsesakal

Arjun Kapoor : बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अर्जुन कपूरचा आता आगामी प्रोजेक्ट हा चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. तो प्रख्यात दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty Latest News) सिंघम अगेनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एका मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरनं जी प्रतिक्रिया दिली आहे ती चर्चेत आली आहे. आपला प्रवास, आपले प्रोजेक्ट अन् आगामी काळातील वाटचाल यावर (Arjun Kapoor latest News) त्यानं दिलेली प्रतिक्रिया त्याच्या विषयी खूप काही सांगून जाणारी आहे. अर्जुनचं म्हणणं आहे की, चाहत्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम मी समजू शकतो पण माझ्या काही खास भूमिका आहेत.

रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन मध्ये अर्जून हा खलनायकाच्या भूमिकेत (Bollywood News) दिसणार आहे. त्याच्या सध्या व्हायरल झालेल्या लूक्सची चर्चा आहे. तो म्हणतो की, मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात ,जर दिग्दर्शकाला वाटत असेल की एखादी वेगळी भूमिका करू शकतो तर मी ती करणारच . सिनेमा हे माझे प्रेम आहे सिनेमासाठी जे त्याला पडद्यावर साकारण्यासाठी निवडलेल्या भूमिकांचा प्रयोग मला करायला आवडते.

अर्जुन म्हणतो, “मी कधीही अभिनेता व्हायचं असं ठरवलं नव्हतं. मात्र मी चित्रपटांच्या प्रेमात पडलो कारण मी आपल्या देशातील लोकांना आनंददायी मनोरंजन देण्यासाठी काही करु इच्छितो. “मला जेव्हा अभिनयाचा अनुभव घ्यायचा होता तेव्हा मला फक्त अभिनयच करायचा होता. कॅमेऱ्याला सामोरे जायचे होते. मला पडद्यावर रोल करण्यासाठी निवडले गेले यावर मी कधीच नाराजही झालो नाही. मला तो आनंद घ्यावासा वाटला. ती प्रक्रिया जाणून घ्यावीशी वाटली.

arjun kapoor latest viral news
Kartik Aaryan About Finance : 'आई मला काही खर्चच करु देत नव्हती, तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं...'

अर्जुन पुढे म्हणतो की, इश्कजादेमध्ये नायकाच्या भूमिकेसाठी त्याची ऑडिशन घेतली जात होती हे त्याला माहिती नव्हतं. “मुख्य भूमिकेत लाँच होणं ही आदित्य रॉय कपूरची इच्छा होती. त्याला माझं काम आवडलं होतं. मी कधीच ऑडिशन दिले नाही! ही भूमिका मिळाल्यावर मी भारावून गेलो होतो. मला तो दिवस अजूनही आठवतो. तो कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक होता.”

अर्जुन म्हणतो मी कधीही कुणापासून असुरक्षिततेची भावना असणारा अभिनेता नव्हतो. मला त्याबद्दल कधीही काही वाटले नाही. “मी सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा खूप आभारी आहे ज्यांनी मला संधी दिली. आता रोहित शेट्टी सारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यानं दिलेल्या संधीचं सोनं करण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचेही अर्जुननं यावेळी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com