Indias Most Wanted : अर्जून कपूर शोधणार देशाच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 May 2019

अॅक्शनपॅक असलेला 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे. 

अभिनेता अर्जून कपूर स्टारर 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपॅक असलेला हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे. 

या चित्रपटात अर्जून कपूर त्याच्या पाच जणांच्या टीमसोबत मिळून एका दहशतवाद्याच्या शोधात असतो. या दहशतवाद्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात स्पष्ट दाखविण्यात आलेला नाही, असे ट्रेलर बघितल्यावर कळते. पण भारताबाहेरही या दहशतवाद्याचा संबंध असतो आणि देशात सार्वजनिक ठिकाणी तो बॉम्ब हल्ले करतो. स्पेशल फोर्समध्ये असलेल्या अर्जून कपूर आपल्या टिमसोबत त्या दहशतवाद्याच्या शोधात निघतो. मात्र त्याला व त्याच्या टिमला देशाचा स्पेशल फोर्स विभाग मदत नाकारते. त्यामुळे कोणतेही शस्त्रास्त्र जवळ न बाळगता अर्जून व टिम देशात विविध ठिकाणी प्रवास करुन दहशतवाद्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवते. आता या शोधात अर्जूनला कोणकोणत्या घटनांचा आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो, ही चित्रपटाची कथा आहे.

अर्जून सोबतच या चित्रपटात राजेश शर्मा, शांतिलाल मुखर्जी, प्रशांत एलेक्जेंडर, देवेंद्र मिश्रा, गौरव मिश्रा, आसिफ खान, बजरंगबली सिंग, प्रवीण सिंग सिसोदिया, राजीव कचरु यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा लेखन राजकुमार गुप्ता यांची आहे. हा चित्रपट 24 मे ला प्रदर्शित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Kapoor Starrer Indias Most Wanted Film Trailer Launch