esakal | अरमान कोहली प्रकरणात NCB ची पाच ठिकाणी छापेमारी
sakal

बोलून बातमी शोधा

Armaan Kohli

NCB ने अरमान कोहली Armaan Kohli प्रकरणात 5 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तसेच याप्रकरणी 2 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे

अरमान कोहली प्रकरणात NCB ची पाच ठिकाणी छापेमारी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- NCB ने अरमान कोहली Armaan Kohli प्रकरणात 5 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तसेच याप्रकरणी 2 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अरमान कोहली याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत. अभिनेता अरमान कोहलीला 1 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आलीये. अरमानच्या घरी NCB ने छापा मारून शनिवारी त्याला अटक केली होती. (Maharashtra Latest News)

अरमान कोहलीच्या घरी अमली पदार्थ आढळून आले आहेत. एनसीबीने त्याच्या घरातून कोकेन हा अमली पदार्थ हस्तगत केला. दक्षिण अमेरिकेतून कोकेनची तस्करी करण्यात आल्याचे एनसीबीच्या आढळलंय. या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी एनसीबीने शुक्रवारी अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली होती.

हेही वाचा: ऑडी कार अपघातात आमदाराच्या पुत्रासह सुनेचा मृत्यू; एकूण 7 ठार

बॉलिवूडच्या ए-ग्रेड कलाकारांशिवाय टीव्ही कलाकारांवरदेखील पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केलीये. ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटक होताना दिसत आहे. NCB याप्रकरणातील आरोपींचा कसून तपास करत आहे. NCB ने याआधी एजाज खान याचीही चौकशी आणि नंतर अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अनेकांची नावं समोर आल्याचं सांगितलं जातंय. एजाजच्या चौकशीत अभिनेता गौरव दीक्षितचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने गौरवच्या घरावर छापेमारी केली.

ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. शादाब हा मुंबईतील सर्वांत मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध ड्रग्ज उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचं नाव पुढे आलं होतं. एप्रिल महिन्यात मुंबई विमानतळावरून एजाजला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं.

loading image
go to top