Bigg Boss Marathi 4: अखेर Top 5 मिळाले!आरोह वेलणकरला दाखवला घरचा रस्ता.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aroh welankar eliminated mid week eviction Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: अखेर Top 5 मिळाले!आरोह वेलणकरला दाखवला घरचा रस्ता..

Bigg Boss Marathi 4: कालचा दिवस बिग बॉस मराठीच्या घरासाठी अत्यंत महत्वाचा आणि तिटकाचा धक्कादायकही होता. बिग बॉसने अचानक मिड वीक एविक्शन म्हणजेच एक सदस्य आठवड्याच्या मध्येच घराबाहेर पडणार असल्याचे बिग बॉसने जाहीर केले आहे, या मध्ये अभिनेता आरोह वेलणकर याला नारळ मिळाला आणि त्याला घरचा रस्ता पकडावा लागला.(aroh welankar eliminated mid week eviction Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मास्टर माइंड अक्षय केळकरला पाहून बिग बॉस म्हणाले.. तू या खेळाचे..

बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता संपत आलं आहे. येत्या रविवारी ८ जानेवारी रोजी बिग बॉसचा फिनाले आहे. या सोहळ्याला आता अवघे तीन दिवस राहिले आहेत. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास सहा स्पर्धकांवर आला होता. त्यामुळे आता थेट शेवटच्या दिवशीच टॉप फाइव्ह स्पर्धक मिळतील असे वाटले होते. पण बिग बॉसने अचानक 'नाशिबाचे दार' हा टास्क घेऊन एकाला घरी पाठवायचे ठरवले. यामध्ये आरोह वेलणकर याचा प्रवास थांबला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.

यावेळी अपूर्वा ही एकमेव सदस्य होती जी 'तिकीट टू फिनाले' घेऊन टॉप पाच मध्ये पोहोचली होती. त्यामुळे अमृता धोंगडे, अक्षय केळकर,आरोह वेलणकर, किरण माने,राखी सावंत हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. अमृता तर बाहेर जाण्याच्या भीतीने ढसाढसा रडली, तिला वाटलं ती घराबाहेर जाईल. पण काल आरोह गेला आणि बिग बॉसच्या घराला टॉप पाच सदस्य मिळाले.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi