'धार्मिक तेढ निर्माण करणा-या प्रकाश झा यांना अटक करा'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या तनिष्काच्या जाहिरातीवरुनही वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर याविषय़ी झालेल्या टीकेवरुन कंपनीला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर इरॉस नाऊ कंपनीने नवरात्रीच्या निमित्ताने तयार केलेले बॉलीवूड सेलिब्रेटींचे तयार केलेले पोस्टरने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या.

मुंबई - मॅक्स प्लेयरवर साधारण तीन महिन्यांपूर्वी आलेल्या आश्रम या बेवसीरीजने तेव्हापासूनच खळबळ माजविण्यास सुरुवात केली होती. अशाप्रकारच्या मालिकेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्णाण होण्याचा धोका आहे असे काही धार्मिक संस्था, संघटना यांचे म्हणणे होते. यावरुन मोठा गदारोळ होण्यास सुरुवात झाली होती. विशेषत; सोशल मीडियावर त्यावर कडाडून टीका करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा प्रकाश झा यांची ही मालिका वादाच्या भोव-यात सापडली आहे. धार्मिक संघर्ष, भावना आणि तेढ निर्माण करणा-या झा यांना अटक करावी अशी मागणी नेटक-यांनी केली आहे. त्यासाठी #Arrest_Prakash_Jha व्टिटवर सुरु करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या तनिष्काच्या जाहिरातीवरुनही वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर याविषय़ी झालेल्या टीकेवरुन कंपनीला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर इरॉस नाऊ कंपनीने नवरात्रीच्या निमित्ताने तयार केलेले बॉलीवूड सेलिब्रेटींचे तयार केलेले पोस्टरने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अखेर इरॉसला आपली चूक कबूल करुन माफीनामा प्रसिध्द करावा लागला. अशा परिस्थितीत प्रकाश झा यांची आश्रम ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतून सर्वसामान्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची टीका अनेकांनी केली आहे.

आता सध्या बिहारमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. प्रकाश झा यापूर्वी अनेकदा निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. त्यांच्या त्या मालिकेतून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी जोधपुर येथील एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र यासगळ्या प्रकरणावर झा यांच्यावतीने कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही. झा यांना समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा, भोंदू बाबांकडून होणारे शोषण या विषयावर एक मालिका बनविण्यासाठी विचारणा केली गेली होती. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चित्रपट तयार करणे ही झा यांची वेगळी ओळख आहे.

आश्रम या मालिकेमध्ये एक भोंदू बाबा तो करत असलेले महिलांचे लैंगिक शोषण, त्याते राजकीय संबंध, तसेच त्याचा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असलेला अप्रत्यक्ष संबंध यावर झा यांनी प्रकाश झोत टाकला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या काही भोंदू बाबांना अटक केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. झा यांच्या या मालिकेचे चित्रिकरण हे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात झाले होते. तसेच समाजातील एका उपेक्षित वर्गाची संघर्षगाथाही मांडण्यात आली आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest prakash jha trends on twitter over second season of web series ashram