शाहरुखच्या फोटोवर अर्शद वारसी म्हणाला, 'हा कोणालाही गे बनवू शकतो..'

टीम ई सकाळ
Monday, 29 June 2020

शाहरुखने त्याचा एक फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता अर्शद वारसीने या फोटोवर केलेली कमेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

मुंबई- शाहरुख खान त्याच्या सोशल साईट्सवर फार ऍक्टीव्ह असतो. चाहत्यांना तो नेहमीच अपटेड देत असतो मग ते व्यावसायिक असो वा वैयक्तिक. नुकतीच शाहरुख खानने सिनेइंडस्ट्रीमध्ये २८ वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने शाहरुखने त्याचा एक फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटीनींही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता अर्शद वारसीने या फोटोवर केलेली कमेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हे ही वाचा: आमीर खानच्या 'या' सहकलाकारावर आली भाजी विकण्याची वेळ..

अभिनेता अर्शद वारसीला शाहरुखचा हा फोटो खूप आवडला आहे त्याने शाहरुखच्या ट्वीटला रिट्वीट करत लिहिलंय, हा फोटो कोणाही माणसाला गे बनवेल. अर्शदच्या या ट्विटवर त्याच्या फॉलोअर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याला त्याच्या भावनांना आवर घालायला सांगितला आहे तर काहींनी मजेशीर इमोजी पोस्ट करुन त्याच्या या कमेंटचा आनंद घेतला आहे.

एका चाहत्याने लिहिलंय, 'हाहाहा अर्शद वारसी सर, तुमच्या स्वप्नांवर जरा कंट्रोल करा.' तर दुसरीकडे काही युजर्सनी अर्शदची पत्नी मारिया गोरेटीला देखील सामील करुन घेतलं आहे. एका चाहत्याने लिहिलंय, 'नाही, अर्शद वारसी असं करु नका. मारिया गोरेटी इथे तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.' तर काही युजर्सनी अर्शदच्या बघण्याच्या दृष्टीचं समर्थन केलं आहे.

एका चाहत्याने लिहिलंय, की 'शाहरुख खानसाठी मी ९५ % सरळ आणि  ५ % गे आहे' तर शाहरुखच्या चाहत्यांनी लिहिलंय, 'पूर्णपणे सहमत, हॉटनेसने परिपूर्ण.'

शाहरुखचा हा फोटो पत्नी गौरी खानने काढला आहे. शाहरुखला सिनेइंडस्ट्रीत २८ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त हा फोटो पोस्ट करत त्याने एक पोस्ट शेअर केली होती.  

arshad warsi comment on shah rukh khan latest pic can turn any man gay  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arshad warsi comment on shah rukh khan latest pic can turn any man gay