Article 370 Twitter Review : 'द काश्मिर फाईल्स' नंतर आता 'आर्टिकल ३७०', प्रेक्षकांनी एका शब्दांत सांगून टाकलं...!

काश्मिर फाईल्सनंतर सध्या आर्टिकल ३७० (Article 370 Twitter Review ) ची चर्चा होताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत.
article 370 movie
article 370 movie esakal

Article 370 Twitter Review: विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्सनं त्यावेळी देशभरामध्ये मोठं वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्या (The Kashmir Files Movie) चित्रपटाचे ज्या पद्धतीनं प्रमोशन केलं गेलं त्याची सगळीकडे चर्चा होती. काश्मिर फाईल्सवर जेवढी टीका झाली तेवढीच त्याच्या वाट्याला लोकप्रियताही मिळाल्याचे दिसून आले.

आता काश्मिर फाईल्सनंतर यामी गौतमच्या आर्टिकल ३७० ची चर्चा (Article 370 Movie Review) होताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जात होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यात नेटकऱ्यांनी उस्फुर्तपणे प्रतिक्रिया देत आर्टिकल ३७० वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणातून (PM Narendra Modi) आर्टिकल ३७० चित्रपटाचा उल्लेख केला होता. त्यावेळी कलाकार यामीनं त्यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले होते. नुसता वाद नव्हे तर ज्या गोष्टींमुळे संघर्षाला सुरुवात झाली त्या मुद्दयांना यामीनं आपल्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेटकऱ्यांना तिचा हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. त्यातील वेगवान कथानक, अॅक्शन, संवाद हे प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे.

भारताचा भौगोलिक, सामाजिक इतिहास वेगळ्या रुपात मांडण्याचा प्रयत्न आर्टिकल ३७० मधून करण्यात आला आहे. पॉलिटिकल ड्रामा म्हणून त्या चित्रपटाकडे पाहिले गेले आहे. अजय देवगणच्या भारदस्त आवाजात आर्टिकल ३७० ला सुरुवात होते. या चित्रपटातील कथानक झुनी हसकर नावाच्या फिल्ड ऑफिसरभोवती फिरताना दिसते. बुरहान वानी हा मुजाहिद्दीनचा नेता आहे. त्याच्या कारवायांनी तो परिसर त्रस्त झाला आहे.

यामीच्या या चित्रपटाला मास्टरपीस असे म्हटले आहे. त्यातील देशभक्तीचा जो विषय आहे त्याला उत्तमरित्या सादर करण्यात आल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी यामीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. बऱ्याच दिवसांनंतर तिचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला. अशा प्रतिक्रियाही तिला नेटकऱ्यांकडून मिळाल्या आहेत.

एनआयएच्या अधिकाऱ्याची यामीनं ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे त्याला तोड नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. एका वेगळ्या प्रकारचा सिनेमॅटिक लिबर्टीचा अनुभव या चित्रपटातून मिळाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट प्रत्येकानं पाहावा असे आवाहनही चाहत्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com