

Aruna Irani birthday know unknown facts about actress : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कधी विनोदी तर कधी गंभीर अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे.
बॉलीवूडमध्ये कित्येक सेलिब्रेटींचे सिक्रेट्स हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखाजी, सलमान खान आणि ऐश्वर्या, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी, यांच्याविषयीच्या अफेअर्सच्या चर्चा चाहत्यांच्या गॉसिपचा विषय असतो. यासगळ्यात अरुणा ईराणी यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते. त्यांच्या मनात एका व्यक्तीविषयी हळवा कोपरा होता. त्याबद्दल त्यांनी सांगितलेही होते.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या
टीव्ही मनोरंजन ते चित्रपट विश्वात वेगवेगळ्या भूमिका साकारुन अरुणाजींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आज त्या आपला ७७ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. यानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अरुणा ईरानी यांचा जन्म १८ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये झाला. तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अरुणा यांच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून झाली होती.
महानायक दिलीप कुमार यांनी देखील अरुणा यांचा अभिनय पाहून त्यांचे कौतुक केले होते. अरुणा यांनी १९७१ मध्ये कारवा चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. त्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले. त्यानंतर मेहमूद यांच्या बॉम्बे टू गोवा या चित्रपटामध्ये त्यांनी धमाल केली होती. त्यात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते.
बॉम्बे टू गोवा नंतर अरुणाजींनी मेहमूद यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते चित्रपट प्रेक्षकांना कमालीचे आवडलेही. त्यांच्या मैत्रीची चर्चा होऊ लागली. बॉलीवूडमध्ये अशा चर्चांना मीडियामधून त्यावेळी खूप रंगवण्यातही आले होते. असंही म्हटले जात होते की, हे दोन्ही सेलिब्रेटी लवकरच लग्नही करणार आहेत. याविषयी सविस्तरपणे अरुणाजींनी एका मुलाखतीमध्ये सविस्तर सांगितलेही होते.
लोकांना गप्पांसाठी कोणताही विषय पुरतो. आमच्याविषयी ते बोलू लागले होते. पण यासगळ्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला होता. मला कारवा नंतर बरेच दिवस काम मिळत नव्हते. मी खूप निराश झाले होते. आम्ही लग्न केले अशी अफवाही त्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरली होती. मला खूप वाईट वाटले होते. लोकं काहीही माहिती नसताना एखाद्या नात्याला कोणतंही नाव देऊन जातात.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण मला त्या अफवानंतर खूपच मानसिक त्रास झाला होता. मुख्य अभिनेत्री म्हणून काम नव्हते. तर सहकलाकार म्हणून काम मिळत होते. कधी खलनायिका तर कधी सपोर्टिंग रोल्स...पण मी जी भूमिका मिळेल ती आनंदानं केली. प्रेक्षकांना त्या आवडल्या. त्यांनी त्याचे कौतूकही केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.