आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात शाहरुखवर शत्रुघ्न सिन्हा नाराज; म्हणाले... Shatrughan Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan case: Shatrughan Sinha extremely upset with Shah Rukh Khan for THIS reason – read statement

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात शाहरुखवर शत्रुघ्न सिन्हा नाराज; म्हणाले...

बॉलीवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) गेल्या काही दिवसांपासून शाहरुखवर(Shahrukh Khan) थोडे नाराज दिसत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी ही नाराजगी बोलून दाखवली आहे. दिग्गज अभिनेता आणि नेता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,''आर्यन खानला(Aryan Khan) जेव्हा पकडण्यात आलं होतं तेव्हा शाहरुखच्या मुलाला ना मी फक्त पाठिंबा दर्शवला तर मी त्याच्या समर्थनार्थ बोललो देखील होतो. पण त्यानंतर शाहरुखनं माझे धन्यवाद मानायला साधा फोन करणं देखील गरजेचं समजलं नाही''. आर्यन खानला आता एनसीबीनं ड्रग्ज केस प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. जेव्हा गेल्या वर्षी आर्यनला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं,तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट शब्दात एनसीबीचा विरोध केला होता. म्हणाले होते,''एनसीबी कारण नसताना पुराव्या अभावी जाणूनबुजून आर्यनला त्रास देत आहे''.

हेही वाचा: कोण आहेत सी.शंकरन नायर, ज्यांच्या बायोपिक मध्ये दिसणार अक्षय कुमार

ज्या-ज्या लोकांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये आर्यन खानला अटक झाली तेव्हा पाठींबा दर्शविला होता त्यात शत्रुघ्न सिन्हा देखील सामिल होते. २४ वर्षीय आर्यन खानला एनसीबीने आता क्लीन चिट दिली आहे. ''आर्यनच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत,ज्यामुळे त्याला क्रुझ शिप ड्रग्ज केस प्रकरणात आरोपी ठरवलं जाऊ शकत नाही'' असं स्पष्ट शब्दातील निवेदन एनसीबीनं जारी केलं आहे. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत आर्यनला क्लीन चिट मिळाली म्हणून आनंद व्यक्त केला पण सोबत शाहरुख खानवर नाराजगी देखील दर्शवली आहे.

हेही वाचा: सोनाक्षीला I Love You म्हणत अभिनेत्यानं दिली प्रेमाची कबुली,जहीर इकबाल कोण?

शत्रुघ्न सिन्हा त्या मुलाखतीत म्हणाले आहेत,''एक पालक म्हणून मी शाहरुखचं दुःखं समजलं होतो. आर्यन खान केस प्रकरणात मला जे त्यावेळी करावसं वाटलं ते मी केलं. पण शाहरुखनं मला साधं थॅंक्यु कार्ड देखील पाठवलं नाही. मी खरंतर तेव्हा आर्यनला जेलमध्ये पाठवण्याच्या विरोधात मुंबईत ज्यांनी-ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यापैकी एक होतो. माझी एक सवय आहे,मी नेहमी सत्याच्या बाजूने बोलतो. मी तेव्हा तेच केलं जे मला योग्य वाटलं. मला वाटलं आर्यनवर अन्याय होत आहे म्हणून मी आवाज उठवला. आता राहिला प्रश्न शाहरुखचा,तर त्यानं मला ना थॅंक्यू म्हटलं ना थॅंक्यू कार्ड पाठवलं''.

हेही वाचा: Amrita Rao Birthday: बॉलीवूडपासून लांब असलेली अमृता सध्या काय करतेय?

मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांना,'तुम्ही शाहरुखशी यासंदर्भात बोललात का?' असं विचारलं तेव्हा ते म्हणाले,''नाही,मुळीच नाही. मी कशाला कॉल करू. मला त्याच्याकडून काही कामाची अपेक्षा नाहीय. त्याला मी संपर्क करावा एवढी मला गरज वाटत नाही. आणि शाहरुखनं माझ्याकडं याबाबतीत मदत मागितली नव्हती असं देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी नमूद केलं आहे''.

हेही वाचा: कोलकातात केकेचा अनैसर्गिक मृत्यू? आता Live Concert विषयी सोनूचा मोठा निर्णय

शत्रुघ्न सिन्हा मोठ्या पडद्यावर शेवटचे आपल्याला २०१८ साली 'यमला पगला दीवाना-फिर से' या सिनेमात नजरेस पडले होते. केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार होते तेव्हा शत्रुघ्न सिन्हा मंत्री देखील होते.

Web Title: Aryan Khan Case Shatrughan Sinha Extremely Upset With Shah Rukh Khan For This Reason Read

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top