Gauri Khan : आम्ही जे भोगले त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही; गौरीने आर्यनच्या प्रकरणावर मौन सोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Khan Comment on Aryan Case

Gauri Khan : आम्ही जे भोगले त्यापेक्षा...; गौरीने आर्यन खानच्या प्रकरणावर मौन सोडले

Gauri Khan Comment on Aryan Case गौरी खान नुकतीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये १७ वर्षांनंतर दिसली. गौरी बेस्ट फ्रेंड्स भावना पांडे आणि महीप कपूरसोबत आली आहे. तिघांनीही वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. वैयक्तिक आयुष्यावर फारसे बोलणे पसंत न करणाऱ्या गौरीने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मोठा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) अटकेपासून ते सुहानाच्या डेटिंग लाइफबद्दल बोलली.

‘काही दिवसांपूर्वी शाहरुखसाठी हा खूप कठीण काळ होता. केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्याही जे काही घडले. एक कुटुंब म्हणून मला माहीत आहे की हे सोपे नव्हते. मी तुला आई आणि शाहरुखला वडील म्हणून चांगल्याप्रकारे ओळखतो. आपण एक कुटुंब आहोत. हे सगळं काही सोपे नव्हते. परंतु, गौरी तुला या काळात खूप खंबीर पाहिले. कुटुंब अडचणीत असताना अशी बिकट परिस्थिती हाताळण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?’ असा प्रश्न करण जोहरने (Karan Johar) गौरीला विचारला.

हेही वाचा: Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या फॅशन डिझायनरची EOW कडून चौकशी

‘होय, एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण कठीण काळातून गेलो. जे घडले ते आई आणि पालक म्हणून यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. प्रत्येकजण आमच्यावर प्रेम करतो. आमचे मित्र आणि ओळखत नसलेल्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. इतके प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्याने धन्य आहे. या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची मी नेहमीच आभारी आहे’, अशी गौरी खान म्हणाली.

आर्यन खानला (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो अनेक दिवस तुरुंगात होता. यानंतर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने क्लीनचिट दिली होती, हे विशेष...

Web Title: Aryan Khan Gauri Shah Rukh Khan Drug Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..