
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख(Asha Parekh) या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी त्यांचा व्यवसायाचा व्याप मोठा आहे. आणि अधून-मधून त्या टी.व्ही कार्यक्रमात परिक्षक किंवा गेस्ट म्हणून हजेरी लावताना दिसतात. आपल्या कामात अशा पद्धतीन त्या बिझी असल्या तरी त्यांचं सोशल मीडियाच्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर एकही अधिकृत अकाऊंट नाही. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आवडत नाही आणि वयाच्या ७९ व्या वर्षी सोशल मीडिया(Social Media) जॉइन करुन त्रास होईल असे कुठलेच नवीन प्रयोग आपल्याला करायचे नाहीत असं त्या म्हणाल्या आहेत. सत्त्तरीच्या दशकातील एक मोठी अभिनेत्री जी आपल्या सुंदर दिसण्यानं,अदाकारीनं सर्वांना घायाळ करण्यात यशस्वी ठरली होती,ती सोशल मीडियाविषयी इतकं गांभीर्यानं बोलतेय म्हटल्यावर विचार करणं भागच आहे. सोशल मीडियाचा अतिरेक आपल्याला आवडत नाही असंही आशा पारेख म्हणाल्या आहेत.
माणसांचा सार्वजनिक ठिकाणी वावर कमी झाला की लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून उगाचच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नको तितकं डोकवायला सुरुवात करतात हे आवडत नसल्याचं आशा पारेख यांनी म्हटलं आहे. आशा पारेख यांनी वयाची ८० गाठताना पुन्हा सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं आपल्या कामामुळं लोकांनी आपल्याला मरेपर्यंत नाही तर त्यानंतरही लक्षात ठेवायला हवं. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आशा पारेख यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुंबईत आयोजित केल्या जाणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलविषयी देखील संवाद साधला आहे.
आशा पारेख त्यांच्या 'तिसरी मंझिल','दिल देके देखो','कटी पतंग','प्यार का मौसम','मेरा गाव मेरा देश','कारवॉं' अशा अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमुळे ओळखल्या जातात. त्यांनी राजेश खन्ना,शम्मी कपूर,जितेंद्र,धर्मेंद्र,अनिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. तसंच केवळ हिंदी नाही तर गुजराती,पंजाबी,कन्नड सिनेमांतूनही त्यांनी अभिनय केला आहे.