Ashish Sakharkar Passes Away: चारवेळा मिस्टर इंडियाचा मान पटकावणाऱ्या जगप्रसिद्ध मराठमोळ्या बॉडीबिल्डरचे निधन

Ashish Sakharkar Passes Away:
Ashish Sakharkar Passes Away:Esakal
Updated on

Ashish Sakharkar Passes Away: जगभरात महाराष्ट्राचा डंका वाजवणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर (Ashish Sakharkar) याची प्राणज्योत मालवली आहे. आशिष हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होते. मात्र त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. या आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे.

Ashish Sakharkar Passes Away:
Richa Chadha : 'प्रोटिन शेक पिणारा नवरा नको होता! मला तर...'

मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारख्या अनेक किताबांवर आशिषनं नावं कोरलं होतं. तो केवळ देशातच नव्हे तर जगभरात त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. तो लोकप्रिय बॅाडीबिल्डिर होता. त्याचे लाखो चाहते होते. त्याच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्याचे चाहते त्याच्या शेवटच्या पोस्टवर त्याला श्रद्धांजली वाहत आहे. त्याच्या जाण्याने चाहत्यांना खुप मोठा धक्का बसला आहे.

आशिष याच्या कामगिरीवर नजर टाकली असता त्याने चार वेळा मिस्टर इंडिया विजेते, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केला होता.

Ashish Sakharkar Passes Away:
Gigi Hadid Arrest: हॉलीवुड अभिनेत्री गिगी हदीदला एअरपोर्टवरच अटक, समोर आलं धक्कादायक कारण

आशिषने शरिरावर खुप मेहनत घेत बॉडीबिल्डिंगच्या जगात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. काही दिवसांपासून तो आजाराने त्रस्त होता. त्याच आजाराने त्याचा जीव घेतला. आशिष साखरकरच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com