अशोक सराफ @75: सेलिब्रेशनमध्ये चाहते होऊ शकतात सहभागी,कसं ते जाणून घ्या ... Ashok Saraf | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf 75th Birthday celebration

अशोक सराफ @75: सेलिब्रेशनमध्ये चाहते होऊ शकतात सहभागी,कसं ते जाणून घ्या ...

अशोक सराफ(Ashok Saraf) हे अभिनय क्षेत्राला मिळालेलं रत्न आहे. त्यांनी आपल्या अभिनयानं गेली अनेक दशकं केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. शेकडो सिनेमे,नाटक,मालिका यामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या डोक्यात एकदम फिट्ट बसल्या आहेत. आज इंडस्ट्रीत ते सर्वांचे मामा म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे लाडाने लोक त्यांना 'अशोक मामा' म्हणतात. आणि अर्थात अभिनयातले 'सम्राट' म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. येत्या ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोक सराफ वयाची ७५(75) वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्तानं मोठा जल्लोष चाहत्यांमध्ये पहायला मिळतोय. तर अशाच अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे आमच्याजवळ. आपणा सर्वांना आपल्या या लाडक्या कलाकाराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये(Birthday Celebration) सहभागी होता येणार आहे. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हेही वाचा: 'राजकीय खेळी सामान्य माणसाला विवस्त्र करते','रानबाजार'चे नवीन भाग येतायत...

मराठी सिनेमा व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 'अष्टविनायक नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे' एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अष्टविनायक संस्थेच्या 'व्हॅक्यूम क्लीनर' नाटकात महत्त्वाची भूमिका करीत आहेत. या नाटकाचा शनिवारी ४ जून रोजी दादरमधील शिवाजी मंदीर(Shivaji Mandir,Dadar) नाट्यगृहात सकाळी १०.३० वाजता प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरा दरम्यान अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

हेही वाचा: सम्राट पृथ्वीराज: रिलीजच्या एक दिवस आधी आखाती देशांनी केलं बॅन? काय खटकलं?

'व्हॅक्युम क्लीनर' या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत निर्मिती सावंत देखील महत्त्वाची भूमिका करीत आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. आणि याच नाट्यप्रयोगा दरम्यान पार पडणाऱ्या सन्मान आणि सत्कार सोहळ्यात नाट्यरसिकांना अशा तऱ्हेनं सहभागी होता येणार आहे. यामुळे ते नाटक पहायला येणाऱ्या रसिकांना अशोक सराफ यांचा अभिनय अनुभवणं आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं आयोजित सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायला मिळणं असा डबल बोनस मिळणार आहे. कोरोनाचा काळ सोडला तर गेली चार वर्ष 'व्हॅक्यूम क्लीनर' हे नाटक अशोक सराफ यांच्या सहकार्यांना रंगभूमीवर चांगली घोडदौड करीत आहे. महाराष्ट्र,गोवा,इंदूर इत्यादी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांसाठी देखील 'अष्टविनायक परिवारानं' नाटकाचे दोन प्रयोग सहकार्य करण्यासाठी सादर केले आहेत. त्यातून मिळालेला तीन लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे.

हेही वाचा: अनन्या पांडेनं केलाय सेक्सिझमचा सामना; म्हणाली,'माझ्या स्तनांवरही लोक...'

अष्टविनायक नाट्यसंस्थेचे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांनी अशोक सराफ यांचा पंच्याहत्तरी निमित्तानं सत्कार करण्याचा मान मिळणं हा आमच्यासाठी मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Ashok Saraf 75th Birthday Celebration At Shivaji

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top