Ashok Saraf लॅरेन्जायटिस आजाराने त्रस्त..निवेदिता सराफ यांच्या माहितीनंतर चाहते चिंंतेत NIvedita Saraf | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf

Ashok Saraf लॅरेन्जायटिस आजाराने त्रस्त..निवेदिता सराफ यांच्या माहितीनंतर चाहते चिंंतेत

Ashok Saraf : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते..विनोदाचे महावीर...अशोक सराफ हे सध्या एका आजारानं त्रस्त आहेत. त्या अजारामुळे त्यांना धड बोलताही येत नाही आहे अशी माहिती अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमा दरम्यान दिली. (Ashok Saraf suffered by laryngitis nivedita saraf reveal)

हेही वाचा: Raj Thackeray यांच्या हस्ते 'पिकोलो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित..

पण आपल्या लाडक्या अभिनेत्या विषयी ही बातमी ऐकल्यानंतर मात्र अशोक सराफ यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अशोक सराफ यांना लॅरेंजायटिस आजारानं ग्रासलं आहे. नेमका काय आहे हा आजार आणि काय त्रास होतो यामुळे अशाक सराफ यांना..चला सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Urfi Javed: कामाचा पत्ता नाही पण कमाईचा आकडा ऐकून बसेल झटका

दोन दिवसापूर्वीच ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे म्हणजेच अशोक सराफ यांचे परम मित्र यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील दिग्ग्ज मंडळींनी हजेरी लावली होती. महेश कोठारे यांच्या पुस्तकाचे नाव आहे 'डॅम इट आणि बरंच काही..' याच कार्यक्रमात निवेदिता सराफ एकट्या नजरेस पडल्या अन् चर्चा सुरु झाली ते अशोक सराफ न आल्याची.

हेही वाचा: Sonali Kulkarni: फोटो सोनालीचे पण चर्चा...

महेश कोठारे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. तसंच सचिन पिळगावर यांनी देखील आपल्या मित्राच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती.

हेही वाचा: Manasi Naik म्हणतेय,'एक तिळ रुसला..फुगला..'

याच कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी चाहत्यांच्या मनातला प्रश्न हेरुन अशोक सराफ कार्यक्रमास का उपस्थित राहिले नाहीत याचं कारण सांगितलं आहे. त्या म्हणाल्या,''आज अशोक या कार्यक्रमास हजर राहू शकला नाही कारण तो सध्या लॅरेंजायटिस(laryngitis) आजारानं त्रस्त आहे. त्याला बोलताही येत नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या नाटकाचे प्रयोगही रद्द करावे लागले. आज तो इथे नसला तरी महेशच्या आनंदात तो सहभागी आहे,त्याच्या पाठीशी एक मित्र तसंच अभिनेता म्हणून नक्कीच उभा आहे''.