ashvini mahangade buy mahindra tractor in diwali 2023 aai kuthe kay karte actress
ashvini mahangade buy mahindra tractor in diwali 2023 aai kuthe kay karte actressSAKAL

Ashvini Mahangade: आलिशान कार तर सगळेच घेतात! पण प्रसिद्ध अभिनेत्रीने दिवाळीत घरी आणला ट्रॅक्टर

आई कुठे काय करते मधील अभिनेत्रीने दिवाळीत ट्रॅक्टरची खास खरेदी केलीय.
Published on

Ashvini Mahangade News: सध्या सर्वत्र दिवाळीनिमित्त आनंदाचं वातावरण आहे. अनेकजण दिवाळीचा मुहूर्त साधत विविध वस्तूंची खरेदी करत असतात. कोणी दागिने विकत घेतं, कोणी आलिशान गाडी कोणी इलेक्ट्रोनिक वस्तू तर कोणी इतर काही.

अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त ट्रॅक्टरची खरेदी केलीय. ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे.

ashvini mahangade buy mahindra tractor in diwali 2023 aai kuthe kay karte actress
Animal Papa Meri Jaan: "कठोर तरीही हळवा", बाप - लेकाचं नातं घट्ट करणारं 'अ‍ॅनिमल'चं नवं गाणं आणेल डोळ्यात पाणी!

आई कुठे काय करते फेम अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत ती ट्रॅक्टर चालवताना दिसतेय. स्वराज्य... भावाने ट्रॅक्टर घेतला. नाना आम्ही स्वराज्य वाढवू आणि टिकवू सुद्धा अशा शब्दात अश्विनीने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेयर केलीय.

अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ महांगडेने हा ट्रॅक्टर खरेदी केलाय. आनंदाची व्याख्या हीच की भाऊ प्रगती करतोय अशा शब्दात अश्विनीने भावाचं कौतुक केलंय.

अश्विनीने सोशल मीडियावर ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत अश्विनीचा भाऊही सोबत असून दोघेही बहीणभाऊ एकदम खुश असल्याचं पाहायला मिळतंय.

अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. तर लवकरच ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात झळकणार आहे. अश्विनी सध्या या सिनेमाचं शुटिंग करत असून लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com