Ashwini Kalsekar birthday: एअर हॉस्टेस, डान्सर ते.. या मराठी अभिनेत्रीचा बॉलीवुडमध्ये भलताच दरारा..

अभिनेत्री अश्विनी काळसेकरचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने ही खास बात..
Ashwini Kalsekar birthday air hostess classical dancer to bollywood actress her career lifestyle movies
Ashwini Kalsekar birthday air hostess classical dancer to bollywood actress her career lifestyle moviessakal

Ashwini Kalsekar birthday: बॉलीवुडमध्ये गाजणारं एक खणखणीत मराठी नाव म्हणजे अभिनेत्री अश्विनी काळसेकर. अश्विनी तशी मुख्य भूमिकेत कधीच दिसली नाही, पण तिने ज्या भूमिका केल्या त्या इतक्या लक्षणीय ठरल्या की प्रेक्षक त्या कधीही विसरणं शक्य नाही. मग गोलमाल असो, भुलभूलैया असो किंवा लक्ष्मी.. तिच्याविषयी अनेक बडे कलाकार आदराने बोलतात इतका तिचा दरारा आहे. ती कधीही कोणत्या पार्टी मध्ये दिसत नाही पण कामातून मात्र बरंच काही बोलते, अशा अश्विनी काळसेकरचा आज वाढदिवस.

(Ashwini Kalsekar birthday air hostess classical dancer to bollywood actress her career lifestyle movies)

Ashwini Kalsekar birthday air hostess classical dancer to bollywood actress her career lifestyle movies
Vanita Kharat: वनिता खरात भलतीच जोरात! ओठांचं चुंबन घेत केलं फोटोशूट..

अश्विनी अभिनयात तशी उशिराने आली, कारण मूळ अभिनय हा तिचा पिंड नव्हता. अश्विनी आणि एअर हॉस्टेस होती, मग तिने नृत्याचे कार्यक्रम केले आणि मग ती अभिनयाकडे वळली. त्याचाही एक किस्साच आहे.

अश्विनी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, 'एअरहोस्टेस असताना शुक्रवारी मला सुट्टी असे आणि त्यादरम्यान एक मैत्रीण मला ऑडिशनला घेऊन गेली. त्यावेळी कबीर भाटीया यांनी माझी ऑडिशन घेतली आणि 'शांती' या मालिकेसाठी निवड केली. शांती मालिका ऑन एअर होईपर्यंत मी एअरलाईन्सची नोकरी सोडली नव्हती. एव्हाना मी शांतीचे शूटिंगही माझ्या सुटीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच करत असे. जेव्हा मी क्षेत्रात काम करू शकते ही समजलं तेव्हाच मी माझी नाकारी सोडली, ज्या निर्णयाने मी आजही समाधानी आहे.'


एअर हॉस्टेस सोबतच त्या उत्तम डान्सर आहेत. त्या म्हणाल्या होत्या, 'मी क्‍लासिकल डान्सरही आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबरोबर मी कथक परफॉर्मन्स करायचे. पण पुढे अभिनयातून संधी मिळत गेल्या आणि मी त्यात जास्त रमले.'

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

अश्विनी यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट केले आहेत. मराठी कार्यक्रम 'फू बाई फू' च्या त्या परीक्षकही होत्या. त्या ज्या पद्धतीने बॉलीवुडमध्ये काम करतात त्याचा सर्वच मराठी प्रेक्षकांना आदर आहे. त्या जवळपास २२ ते २३ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आपण आपलं काम परफेक्‍ट असल्यावर योग्य तो मान आणि प्रेम मिळतंच, असं त्या कायम सांगत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com