Aspirants 3 Season : 'अँस्पिरंट्स' च्या नवीन सीझनची घोषणा, संदीप भैय्या सांगणार यशाचा फॉर्म्युला?

सोशल मीडियावर अॅस्पिरंट्सचे चाहते मोठे आहेत. आता त्याच्या नवीन सीझनची घोषणा करण्यात आली आहे.
Aspirant web serise third season announcement
Aspirant web serise third season announcementesakal

Aspirant web serise third season announcement : ज्या वेबसीरिजनं लाखो एमपीएससी, युपीएससी करणाऱ्या अॅस्पिरंटला प्रेरणा देण्याचे काम केले त्या अॅस्पिरंट्स वेब सीरिजला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. त्यातील संदीप भैय्या या व्यक्तिरेखेला नेटकऱ्यांची मोठी दाद मिळाली होता. आता अॅमेझॉन प्राईमनं मोठी घोषणा केली असून त्यामुळे अॅस्पिरंट्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोशल मीडियावर अॅस्पिरंट्सचे चाहते मोठे आहेत. त्या मालिकेविषयी भरभरुन बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्या मालिकेचा विषय,त्याची मांडणी, त्यात काम करणारे कलाकार, संवाद आणि छायाचित्रण हे सारं इतकं प्रभावी होतं की, त्यामुळे त्या मालिकेला लाखोच्या संख्येनं व्ह्युज मिळाले होते. त्याच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची दाद मिळाला होती.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

आता प्राइम व्हिडिओने द एस्पिरंट्सच्या नव्या सीझनची घोषणा केली आहे. साठी जगभरातील प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे, ज्याचा प्रीमियर 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मालिकेला आयएमडीबीनं ९.२ एवढे रेटिंग दिले होते. हा भारतातील एक टॉपरेटेड शो आहे. आता या शोचा नवा सीझन येत आहे. या मालिकेतील अभिलाष, गुरी आणि संदीप चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

Aspirant web serise third season announcement
Shah Rukh Khan: शाहरुख 'नमस्ते' नाही तर 'सलाम' करतो, किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत लिहीली पोस्ट

The Viral Fever (TVF) द्वारे निर्मित, हा शो अपूर्व सिंग कार्की यांनी दिग्दर्शित केला आहे. नवीन कस्तुरिया, शिवंकित सिंग परिहार, अभिलाष थापलियाल, सनी हिंदुजा आणि नमिता दुबे यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com