
सलमान आणि कतरिनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल मचवतो यात काही शंका नाही.सलमान-कतरिना प्रेक्षकांची आवडती जोडी असल्यानं त्यांच्या चित्रपटाच्या वेळी थिएटर देखिल हाऊसफुल असतात.(Teaser)प्रेक्षकांची ही आवडती जोडी आता परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'टायगर ३' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून कतरिनाचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
बहुप्रतिक्षित असलेल्या सलमान आणि कतरिनाच्या 'टायगर ३' या चित्रपटाचा टीझर यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रदर्शित केलाय.(Salman Khan)यशराज फिल्म्सने टीझर प्रदर्शित करण्याबरोबरच 'टायगर ३' च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे.सलमानचे जवळपास सगळेच चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतात.(Yashraj Films)त्यामुळे हा चित्रपट देखिल २०२३ मधे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत.
आणखी खास सांगायचे झाल्यास हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.काही तासांतच हा टीझर हजारो लोकांपर्यंत पोहोचला आहे.व्हि़डिओमधील नव्या आणि हटके लूकसाठी प्रेक्षकांनी कतरिनाचे कौतुकदेखील केले आहे.व्हिडिओमधे घामाने ओली झालेली कतरिना प्रचंड रागात दिसते.खरं तर कोणावर तरी वार करण्याच्या तयारीत ती या व्हिडिओमधे दिसतेय.