esakal | के.एल.राहुलने अथियाला म्हटलं 'Mad Child'!
sakal

बोलून बातमी शोधा

lokesh rahul post in athitya shetty

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा कडून अथियाने प्रशिक्षण घेतले आहे. 2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात अथिया झळकली आहे.  

के.एल.राहुलने अथियाला म्हटलं 'Mad Child'!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - लोकेश राहुल सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे. त्या पोस्टमुळे त्याच्या आणि अथिया शेट्टी यांच्यातील लव स्टोरी नेटक-यांच्या नजरेत आली आहे. त्यांनी त्यावर काही गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे हे सगळं अथियाच्या जन्मदिनाच्या दिवशी झाल्याने त्यावरुन चर्चा रंगु लागली आहे.

अथियाच्या वाढदिवसानिमित्त लोकेश राहुलनं केलेल्या पोस्टची चर्चा सुरु झाली. किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) कर्णधार आणि टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा त्या दोघांच्या चाहत्यांसाठी गप्पांचा विषय ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीने तिचा वाढदिवस साजरा केला असून तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकेशनं शेयर केलेल्या पोस्टमध्ये तिला 'Mad Child'! असं म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली.  अभिनयाव्यतिरिक्त अथिया शेट्टीला नृत्य करण्याची खूप आवड आहे. . राहुल आणि अथिया हे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या सोशल अकाऊंटवर दोघंही लाईक्स कमेंट्स करतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळेच गुगलनं अथिया शेट्टीच्या प्रोफाईलवर लोकेश राहुलची पत्नी असे नमूद केले होते. त्यात आता लोकेशच्या नव्या पोस्टनं पुन्हा यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा कडून अथियाने प्रशिक्षण घेतले आहे. 2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात अथिया झळकली आहे.  

loading image