Athiya Shetty-KL Rahul च्या लग्नात ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी, सलमान-शाहरुखसह यादी जाहीर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

athiya shetty kl rahul wedding guest list viral salman khan ms dhoni shahrukh khan and many celebrities invited by suniel shetty

Athiya Shetty-KL Rahul च्या लग्नात ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी, सलमान-शाहरुखसह यादी जाहीर..

Athiya Shetty-KL Rahul : बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी आता लवकरच सासरा होणार असून लेकीच्या लग्नाची तो जय्यत तयारी करत आहे. सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलच्या आज लग्नबंधनात अडकणार आहेत. एका दिमाखदार सोहळ्यात ते अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. या लग्नात नेमकं कोण सहभागी असणार आहे, याची यादी आता जाहीर झाली आहे.

(athiya shetty kl rahul wedding guest list viral salman khan ms dhoni shahrukh khan and many celebrities invited by suniel shetty)

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाचा मंडप सजला आहे, वधू-वरांचीही सर्व तयारी झाली आहे. नवीन वर्षातलं ते बॉलिवूडमधलं पहिलं लग्न असल्याने या लग्नाची विशेष चर्चा आहे. सुनिल शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये हे लग्न पार पडणार आहे. या लग्नाला घरच्या पाहुण्यांसोबत बॉलीवुड सेलिब्रेटी देखील उपस्थित राहणार आहेत.

यापैकी काही कलाकारांची नावं आता समोर आली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नाला सलमान खान, शाहरुख खान आणि एमएस धोनीसह केवळ १०० पाहुणे असणार आहेत. शिवाय या लग्नाला येणाऱ्यांना नो-फोन पॉलिसी लागू करण्यात आली आहे. म्हणजे या लग्नात कुणालाही फोन वापरता येणार नाही.

याशिवाय या लग्नात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ ही बडे कलाकारही सहभागी होणार आहेत. टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आणि बॉलिवूड फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाही या फार्म हाऊसवर पोहोचले आहेत. आज दुपारी 4 वाजता दक्षणीतया पद्धतीने ही लग्न होणार आहे.