Suniel Shetty : पोरगी रँम्पवर, जावई झाला चिअर लिडर! सासऱ्याला आणखी काय हवं?

केएलनं देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अथियाचे फोटो पोस्ट केल्याचे दिसून आले आहे.
KL Rahul gushes over stunning wife Athiya Shetty
KL Rahul gushes over stunning wife Athiya Shettyesakal

KL Rahul gushes over ‘stunning wife’ Athiya Shetty’s ramp walk : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिचं काही महिन्यांपूर्वी भारताचा स्टार फलंदाज के एल राहूल सोबत लग्न झालं. चाहत्यांना कमालीचा आनंद झाला. दोन्ही सेलिब्रेटींचे चाहते असंख्य आहेत. यासगळ्यात राहुलचे सासरेबुवा सुनील शेट्टीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.

गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि राहूल हे वेगवेगळ्या कारणांसाठी लाईमलाईटमध्ये आले आहेत. सध्या सोशल मीडियावर अथियाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे. त्यामध्ये ती रँप वॉक करताना दिसत आहे. यावेळी अथियानं तिच्या चाहत्यांना आपल्या सौंदर्यानं जिंकून घेतल्याचे दिसून आले. प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी इंडिया कोर्टूर वीक २०२३ साठी त्या ड्रेसची डिझायन तयार केली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

Athiya Shetty
Athiya Shetty

अथियाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. त्यात चक्क सासऱ्यांनी तर लाडक्या लेकीचं तोंडभरून कौतूकही केलं आहे. माझी मुलगी म्हणजे देशी तूप आहे. अशा शब्दांत त्यांनी तिची प्रशंसा केली आहे. त्यात अथियाचा पती राहूल देखील त्या शो मध्ये उपस्थित होता. तो चिअरलीडरच्या भूमिकेत होता. त्याचेही फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

केएलनं देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अथियाचे फोटो पोस्ट केल्याचे दिसून आले आहे. त्यानं त्या आपल्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माझी सुंदर बायको...अथियानं देखील त्या कौतूकाचा स्विकार करत त्याला रिटर्न्स थँक्स दिले आहे. यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या प्रतिक्रिया मात्र सासरे सुनील शेट्टी यांना उद्देशून असल्याचे दिसून आले आहे. सध्या सासरेबूवा भलतेच खूश आहेत. असे म्हणत, जावयाचे कौतूक काही केल्या संपता संपत नाही असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

अथियानं २०१५ मध्ये बॉलीवूड डेब्यू केलं होतं. हिरो नावाच्या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये आली. प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर अथियानं मुबारक आणि मोतीचूर चकनाचूर नावाच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com