Atiq Ahmed Murder: अतिक अहमदच्या हत्येनंतर का रंगतेय मिर्झापूर सिरिजची चर्चा? Twitter वर ट्रेंडिंग

Atiq Ahmed Murder:
Atiq Ahmed Murder:Esakal

Atiq Ahmed Murder: उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तिघांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हत्येची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मिडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतांनाच दुसरीकडे त्यासोबतच मिर्झापूर ही वेबसीरिजही ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

Atiq Ahmed Murder:
Huma Qureshi: लग्न कधी करशील? हुमा म्हणते, 'दबावात येऊन मी...'

मिर्झापूर ही प्राइम व्हिडिओची एक खुपच लोकप्रिय क्राईम थ्रिलर मालिका आहे. या मालिकेची लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. या मालिकेत तुम्हाल गोळीबार,खून, हत्येचा थरार अशी अनेक दृश्ये सर्वांनी पाहिली आहेत.

अजूनही या सिरिजचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यातच काल रात्री ज्या प्रकारे अतिक अहमद हा मारला गेला, ज्या प्रकारे गोळीबार झाला यावरुन लोकांना मिर्झापूर वेबसिरिजची आठवण झाली.

मिर्झापूर वेबसिरिजला अतिक अहमदशी जोडून नेटकरी ट्विटरवर ट्विट करत आहेत. सध्या ट्विटरवर #Mirzapur हे ट्रेंडिग होत आहे.

एका ट्विटर युजरने लिहिले की, "मिर्झापूरचा तिसरा सीझन खूप वेळ घेत आहे, म्हणून आधी थोडा टीझर दाखवला." मिर्झापूरसोबतच लोक गुड्डू भैय्याचे नाव घेऊन ट्विट करत आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "खऱ्या यूपीच्या तुलनेत मिर्झापूर काही नाही."

Atiq Ahmed Murder:
Shaakuntalam BO Collection: समांथाच्या 'शाकुंतलम'ची दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाईट अवस्था, केली इतकी कमाई
Atiq Ahmed Murder:
Lara Dutta Birthday: पहिलाच सिनेमा ठरला असता अखेरचा.. अजूनही तो प्रसंग आठवला की घाबरते लारा..

मात्र, मिर्झापूरचे पहिले आणि दुसरे दोन्ही सिझन चांगलेच आवडले. चाहते या सिरिजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहात आहेत. ते या सिरिजबद्दल अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सूक असतात.

नुकताच वेब सीरिजचा लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तपातही दिसत आहे. प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. या सिरिजमध्ये पंकज त्रिपाठी, दिवेंदु शर्मा आणि अली फजल या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com