World Cup 2023 final : अहमदाबादच्या प्रेक्षकांनी जर वेळीच....प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकरांची पोस्ट चर्चेत | World Cup Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Kasbekar Photographer Producer x post

World Cup 2023 final : 'अहमदाबादच्या प्रेक्षकांनी जर वेळीच....' प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकरांची पोस्ट चर्चेत

Atul Kasbekar Photographer Producer x post : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात जे घडलं त्यामुळे लाखो क्रिकेटचाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जो वर्ल्ड कप उंचावण्याची स्वप्नं भारतीय संघ पाहत होता तो अखेर ऑस्ट्रेलियानं जिंकून घेतला. या सगळ्याचे पडसाद सोशल मीडियावर तीव्र पद्धतीनं उमटल्याचे दिसून आले आहे.

विविध सेलिब्रेटींनी देखील सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत भारतीय खेळाडुंचे सात्वंन केले आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडुंचे मनोबल उंचावले आहे. त्यांना धन्यवाद देत त्यांच्या खेळीचे कौतुक केले आहे. या सगळ्यात प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांच्या एका पोस्टनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी अहमदाबाद येथील स्टेडियमध्ये असणाऱ्या प्रेक्षकांवर तोफ डागली आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

त्या स्टे़डियममधील प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भारतीय संघाला जेव्हा चिअर अपची गरज होती तेव्हा ते केले नाही आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला. अशा शब्दांत कसबेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या गर्दीनं भारतीय खेळाडुंचा अनादर केला असे म्हणावे लागेल. अंतिम सामन्यात भारतीय संघाला जेव्हा चिअर अपची गरज होती तेव्हा चाहते शांत होते. त्यांच्या मोठ्या आधाराची गरज तेव्हाच होती हे मात्र दिसले नाही.

यंदाच्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारताची सरशी होणार असे सगळेजण म्हणत होते. मात्र तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियानं सरस खेळ करत पुन्हा एकदा आपणच जगज्जेते आहोत हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांनी इंडियावर मात केली. सोशल मीडियावर विविध सेलिब्रेटींनी भारताच्या बाजूनं ट्विट करत खेळाडुंना सलाम केला आहे. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीनं देखील खेळाडुंना ट्रोल करणाऱ्यांवर तोफ डागल्याचे दिसून आले.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला एक लाख तीस हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट मिळाल्यानंतर भारतीय संघाचा विजय निश्चितच होता असेही बोलले जात होते. प्रत्यक्षात मैदानावर जे घडलं ते वेगळचं होतं.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं एका पत्रकार परिषदेमध्ये जे विधान केलं होतं ते त्यानं खरं करुन दाखवलं. तो म्हणाला होता की, आपल्याला मैदानावर शांतता आवडेल. मैदानावर भारतीय प्रेक्षकांचा जास्त आवाज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ...अशा शब्दांत त्यानं भारतीय संघाला आव्हान दिलं होतं. मात्र ते आव्हान भारतीय खेळाडुंना पेलवलं नाही. आणि त्याची परिणीती पराभवात झाली.

कसबेकर यांनी म्हटले आहे की, अहमदाबाद मधील चाहत्यांना आपण कशाप्रकारे चिअर अप करावे याची माहितीच नव्हती. त्यापेक्षा वानखेडेमधील प्रेक्षक चांगले. स्टेडियममध्ये ज्यांना खेळाची माहिती आहे अशा प्रॉपर चाहत्यांनाच प्रवेश मिळावा. कारण मुंबईतील वानखेडेवर जेव्हा मॅचमध्ये शमीकडून कॅच सुटला तेव्हा प्रेक्षकांनी शमीला तो गोलंदाजीला आल्यानंतर चिअरअप केले होते. ही महत्वाची गोष्ट आहे. असे कसबेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.