बॉलीवूड, टॉलीवूडला 'अवतार' एकटा नडला! भारतातून विक्रमी कमाई | Avatar 2 Movie Collection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avatar Movie Collection

Avatar 2 Movie Collection : बॉलीवूड, टॉलीवूडला 'अवतार' एकटा नडला! भारतातून विक्रमी कमाई

Avatar Movie Box Office Collection : टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या तेरा वर्षांच्या मेहनतीचे फळ त्यांना अवतारच्या निमित्तानं मिळाले आहे. या चित्रपटानं जगभरातून दोन बिलियन पेक्षाही विक्रमी कमाई केली आहे. भारतामध्ये तर बॉलीवूड, टॉलीवूडच्या चित्रपटांना मागे सारले आहे. सगळीकडे अवतार २ चे कौतूक सुरु आहे.

अवतारच्या द वे ऑफ वॉटरची प्रेक्षक तब्बल तेरा वर्षे वाट पाहत होते. जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र त्यानं जगभरामध्ये कमाल केली आहे. या चित्रपटाचा लंडनमध्ये प्रीमिअर पार पडला होता. त्यात प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, परिक्षक आणि चाहत्यांनी अवतारवर कौतूकाचा वर्षाव केला होता. चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

असा चित्रपट पुन्हा न होणे या शब्दांत अनेकांनी अवतारच्या दुसऱ्या पार्टचे कौतूक केले होते. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट भारतातमध्ये देखील कमाईचे वेगवेगळे विक्रम करताना दिसतो आहे. आता त्यानं टॉलीवूडच्या कांताराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अवतार हा २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Genelia Deshmukh : 'वेड तुझा प्रणय हा नवा!'

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी ज्या चित्रपटांनी विक्रमी कमाई केली होती त्यांना देखील अवतारनं मागे टाकले आहे. त्यामध्ये गंगुबाई काठियावाडी, ब्रम्हास्त्र, भुलभुलैय्या २ या चित्रपटांचा समावेश आहे. १६ डिसेंबरला जगभरामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे. भारतामध्ये अजुनही अवतारची मोठी क्रेझ आहे.

अवतारनं आता भारतातून पावणे चारशे कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं ४० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यात देखील अवतार हा प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसतो आहे.