
Avatar 2 Movie: असा ट्रेलर यापूर्वी कधीही पाहिला नसेल! नजर हटणार नाही...
Avatar the waty of water: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून आतुरतेनं वाट पाहत होते त्या जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित अवतार 2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटाचे नाव अवतार 2 द वे ऑफ वॉटर असे आहे. (Entertainment News) साधारण तीन वर्षांपूर्वी जेम्स कॅमेरुन यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर कोरोनाचा काळ आणि या चित्रपटाच्या प्रॉडक्शन (Bollywood Movie) प्रक्रियेतील विलंब यामुळे त्याच्या प्रदर्शनाचा मुहूर्त काही केल्या सापडत नव्हता. आता सोशल मीडियावर त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंटस केल्या आहे. ग्राफीक्स, यावेळी अवतारच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. तो ट्रेलर पाहत असताना त्यावरुन नजर हटणार नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही यावेळी सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या आहेत.
टायटॅनिक चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून जेम्स कॅमेरुन यांची वेगळी ओळख जगभर पसरली आहे. त्यांच्या यापूर्वीच्या अवतारच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. अवतार द वे ऑफ वॉटरच्या टीझरच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. ट्रेलरमध्ये सांगितल्या प्रमाणे येत्या वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अवतारच्या दुसऱ्या पार्टवर निर्माते आणि दिग्दर्शक यांचे काम सुरु आहे. या चित्रपटामध्ये आतापर्यत अनेक अडथळे आले आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या अवतारविषयीच्या पहिल्या भागातील आठवणींना उजाळा देत मेकर्सला शुभेच्छा दिल्या आहे. 16 डिसेंबरमध्ये हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
हेही वाचा: शेतकऱ्याचा मुलगा थेट Hollywood मध्ये, वाचा स्वप्नीलची यशस्वी कहाणी
सोशल मीडियावर 1 मिनिट आणि 38 सेकंदाचा टीझरचा ट्रेलर व्हिडिओ व्हायरल झाले आहे. अवतारच्या ऑफिशियल पेजवरुन हा टीझर शेयर करण्यात आला आहे. त्याला वीस लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नव्या टीझरमधून अवतारच्या दुसऱ्या भागाविषयी कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र त्यातील ग्राफीक्स, कॅमेरा, संगीत हे सारं थक्क करणारं आहे. थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असेल असं या टीझरमधून दिसून येते. त्या पूर्ण टीझरमध्ये एक संवाद आहे तो म्हणजे, त्या टोळीतील मुख्य नेता म्हणतो, मला एक गोष्ट माहिती आहे आपण कुठेही गेलो तरी एक कुटूंब म्हणून भक्कमपणे संघर्ष करत राहु, आणि सुरक्षित असु....
Web Title: Avatar 2 Teaser Trailer Viral Social Media December Release Date
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..