'तुम्ही राव भारीच! जबरी गाणं...' अवतारच्या दिग्दर्शकानं केलं नाटू-नाटूचं कौतूक, जर हे... | James Cameron On RRR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

James Cameron On RRR

James Cameron On RRR : 'तुम्ही राव भारीच! जबरी गाणं...' अवतारच्या दिग्दर्शकानं केलं नाटू-नाटूचं कौतूक, जर हे...

James Cameron compliments 'RRR' music : जगभरामध्ये सध्या एस एस राजामौलींच्या आरआऱआरची चर्चा आहे. त्या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आरआऱआऱला ऑस्कर मिळायलाच हवा. अशी भूमिका चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी घेतली आहे. यासगळ्यात आणखी एक शाबासकीची थाप आरआऱआरच्या पाठीवर पडली आहे.

ज्या चित्रपटानं जगभरातून अब्जावधींची कमाई केली आहे, एकट्या भारतातून तीनशे कोटींहून जास्त कमाई करणाऱ्या अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी आरआरआऱचं कौतूक केलं आहे. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एम एम किरवाणी यांची प्रशंसा केली आहे. यापूर्वी देखील आरआरआरवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अवतारच्या दिग्दर्शकानं दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

एम एम किरवानी यांनी सोशल मीडियावरुन अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांचे आभार मानले आहे. तुम्ही केलेल्या कौतूकाबद्दल मनपूर्वक धन्यवाद असेही ते म्हणाले आहेत. कॅमेरुन यांनी आपल्या खास शैलीत या चित्रपटाचे आणि त्यातील गाणी, संगीताचे कौतूक केले होते. ते म्हणाले नाटू नाटू गाणं म्हणजे आनंदाचा महासागर आहे. त्यात कमालीची उर्जा आहे.

हेही वाचा: Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

गेल्या काही दिवसांपासून आरआरआर हा चित्रपट वेगवेगळे पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवताना दिसतो आहे. नुकताच या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला मिळालेला गोल्डन ग्लोब हा कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. कॅमेरुन म्हणाले, मी तर आरआरआर चित्रपट दोन वेळा पाहिला, त्यानंतर मला जे जाणवलं ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

तुमचा चित्रपट आनंदाचा झरा आहे. तुमचं सगळ्यांचे खूप कौतूक. कुतूहलाला मोठं मनोरंजन पद्धतीनं सादर करुन तुम्ही सादर केले आहे. त्याचेही कौतूक. यावेळी किरवानी यांनी जेम्स कॅमेरुन यांनी आरआऱआऱ पाहून जी प्रतिक्रिया दिली त्यावर शेर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

माझ्या कामाचे चीज झाले. आपण जेवढे कष्ट घेतले त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली हेही महत्वाचे आहे. त्यात कॅमेरुन यांची प्रतिक्रिया उत्साह वाढवणारी आहे. असे किरवानी यांनी म्हटले आहे.