आयुषमानला वाढदिवसाचं चाहत्यांकडून 'हे' मोठं गिफ्ट

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. त्याचे अनेक चित्रपट हे नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. आजच्या स्पेशल दिवशी त्याला चाहत्यांकडून एक खास गीफ्ट मिळालं आहे.

मुंबई : बॉलिवू़डचा अभिनेता आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे तो त्याच्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी. आजपर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा प्रवास सोपा नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने वेगळा ठसा उमटवला. आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. त्याचे अनेक चित्रपट हे नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. आजच्या स्पेशल दिवशी त्याला चाहत्यांकडून एक खास गीफ्ट मिळालं आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ड्रिम गर्ल' ने एका दिवसातच रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेय.

चित्रपट समिक्षक तरण आदर्शने आयुषमानच्या काही चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे समोर आणले आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी 'ड्रिम गर्ल' ने 10.5 कोटींची कमाई केली आहे. आयुषमानच्या आतापर्यंतच्या काही ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

आयुषमान आणि नुसरत भरुचा यांचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'ड्रिम गर्ल' नुकताच  प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच ओपनिंग केली आहे. तरण आदर्श यानेदेखील या चित्रपटाला चार स्टार देत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्याने या चित्रपटाचं समिक्षण चक्क एका शब्दात करताना लिहिलं आहे की, "#Dreamgirl : विजेता".


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushman khurana s first day collection of dream girl