आयुषमान नावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा N, R का लिहितो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayushmann Khurrana

आयुषमान नावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा N, R का लिहितो?

जगभरात २० जून हा दिवस 'फादर्स डे' Father's Day म्हणून साजता केला जातो. या दिनानिमित्त सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत आहेत. अभिनेता आयुषमान खुरानानेही Ayushmann Khurrana त्याच्या वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत त्याच्या नावाच्या स्पेलिंगमागील किस्सा सांगितला. आयुषमान त्याचं नाव इंग्रजी लिहिताना स्पेलिंगमध्ये दोन वेळा एन (n) आणि आडनावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा आर (r) लिहितो. तो असं का करतो, यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. (Ayushmann Khurrana says this is the reason behind double ns and double rs in my name)

'लहानपणी वडिलांनी लावलेली निर्बंधं तोडायला खूप मजा यायची आणि आता मोठं झाल्यावर स्वत:हून स्वत:वर लादलेली निर्बंधं तोडली जात नाहीत. संगीताची आवड, कविता, फिल्म्स, कला या सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाल्या. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं पण ज्योतिषशास्त्रात त्यांना विशेष रस होता. माझ्या नावातील दोन एन आणि आर या अक्षरांमागे तेच कारणीभूत आहेत. त्याचसोबत त्यांनी आम्हाला हेदेखील शिकवलं की स्वत:चं भविष्य घडविण्याची क्षमता आपल्यात असते. माझा मित्र, माझे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक, माझे बाबा', असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा: Khatron Ke Khiladi 11: रोहित शेट्टीसह स्पर्धकांना मिळतंय तब्बल इतकं मानधन

आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप आणि भाऊ अपारशक्ती खुराना यांनी या पोस्टवर हृदयाचे इमोजी पोस्ट केले. लेखक अनमोल मलिकने लिहिलं, 'हे कॅप्शन खरंच खूप भावनिक आहे.' तुला आणि तुझ्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा, असे कमेंट्स आयुषमानच्या चाहत्यांनी केले.

नावातील स्पेलिंग बदलाबाबत आयुषमानने २०१७ मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, 'माझ्या जन्माच्या आधीपासूनच बाबांना ज्योतिषशास्त्रात फार रस होता. स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा ट्रेंड हा देशभरात आणि मुंबईत फारच नंतर आला. माझ्या भावाच्या नावाची स्पेलिंग हे अंकशास्त्रानुसार बरोबर होती, म्हणून त्याला त्यात बदल करावा लागला नव्हता. पण माझं नाव थोडं वेगळं असल्याने अंकशास्त्रानुसार त्यांनी त्यात बदल सुचवले.'

Web Title: Ayushmann Khurrana Says This Is The Reason Behind Double Ns And Double Rs In My

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top