'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्यमान खुराना करेल 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची कथा समलैंगिक प्रेमकथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटात आयुष्यमान आणि अभिनेता दिव्येंदू शर्मा ही जोडी दिसणार आहे.

अभिनेता आयुष्यमान खुराना नेहमीच त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ओळखला गेला आहे. आयुष्यमान एक असा कलाकार आहे ज्याच्यामुळे बॉलिवूडमधील चित्रपटांच्या कथेत बदल झाले आहेत. 'विक्की डोनर' ते 'बधाई हो' पर्यंत आयुष्यमानला इंडस्ट्रीने बघितले आहे. आताही असाच एक हटके विषय घेऊन आयुष्यमान प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट घेऊन येणार आहे. 

या चित्रपटाचे नाव आहे 'शुभ मंगल ज्यादा सावधान'. हा चित्रपट 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाचा सीक्वल आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. 

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची कथा समलैंगिक प्रेमकथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटात आयुष्यमान आणि अभिनेता दिव्येंदू शर्मा ही जोडी दिसणार आहे. चित्रपटात आयुष्यमान आणि दिव्येंदू रोमान्स करताना दिसणार आहे. अद्याप याबद्दल या अभिनेत्याकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून अधिकृतरित्या कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य करणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांचे प्रोडक्शन हाऊस करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाची कथा रुढी परंपरामध्ये अडकलेल्या कुटुंबाभोवती फिरते. हा विनोदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या शूटींगला पुढील वर्षी 2020 मध्ये सुरवात होईल. 

'प्यार का पंचनामा' फेम दिव्येंदु शर्मा हा शेवटचा 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय तो शाहिद कपूर अभिनीत 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटात दिसला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayushmann Khurrana will romance with the actor Divyendu Sharma in Shubh Mangal Zyada Saavdhan