B Grade Movies : ‘या’ टॉप अभिनेत्रींनी केले बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम; ओलांडल्या मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood B Grade Movies

B Grade Movies : ‘या’ टॉप अभिनेत्रींनी केले बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

Bollywood B Grade Movies बॉलिवूडमधील (Bollywood) काही अभिनेत्रींनी (Actress) हॉलिवूडमध्ये काम केले आहे. दुसरीकडे अनेक अभिनेत्रींनी स्वःबळावर चित्रपट हिट केले आहेत. परंतु, काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांची गणना ए लिस्टमध्ये केली जाते. परंतु, त्यांनी कधी बी ग्रेड चित्रपटात काम केले आहेत. या यादीत मनीषा कोईरालापासून कतरिना कैफपर्यंत नावांचा समावेश आहे.

एकेकाळी मनीषा कोईरालाची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात असे. मनीषाने उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या खात्यात अनेक हिट चित्रपट होते. मनीषाने बी ग्रेड चित्रपट ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’मध्ये काम केले आहे, हे फार लोकांना माहित नाही. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर शौरी दिसला होता.

बॉलिवूडची (Bollywood) खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाणारी ईशा कोप्पीकरचे नावही या यादीत सामील झाले आहे. ईशा कोप्पीकरची कारकीर्द फारशी खास नव्हती, पण तिचे काही परफॉर्मन्स खूप दमदार होते. हसीना या चित्रपटात ईशा कोप्पीकरने खूप बोल्डनेस दाखवला होता. या बी ग्रेड चित्रपटाची क्वचितच चर्चा होते.

उर्वशी ढोलकियाची गणना टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये (Actress) केली जाते. तिने बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. उर्वशी ढोलकियाने अभिनय केलेल्या बी ग्रेड चित्रपटाचे नाव किस आहे. उर्वशी ढोलकियाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहते तिचे पोस्ट लाइक करतात.

अभिनेत्री नेहा धुपिया केवळ तिच्या प्रोफेशनलच नाही तर पर्सनल लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असते. नेहा धुपियाने दमदार अभिनयाने मन जिंकले आहे. नेहा एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम होस्ट देखील आहे. शीशा या चित्रपटात नेहा धुपियाने खूप बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटात नेहासोबत सोनू सूद दिसला होता. या चित्रपटामुळे नेहा धुपिया खूप चर्चेत होती.

कतरिना कैफने करिअरमध्ये अनेक दमदार परफॉर्मन्स दिले आहेत. मात्र, कतरिनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे की, तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कतरिना कैफने बूम चित्रपटात गुलशन ग्रोवरसोबत स्टीमी हॉट सीन्स दिले होते. आजही अनेकवेळा कतरिना सोशल मीडियावर बूममुळे चर्चेत येते.

Web Title: B Grade Movies Bollywood Actress Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..