esakal | रामदेव बाबा ही है शक्तिमान; इंडियन आयडॉलमध्ये उचलला सिलिंडर

बोलून बातमी शोधा

baba Ramdev picks cylinder hand set Indian idol 12 jay bhanushali looking shocked
रामदेव बाबा ही है शक्तिमान; इंडियन आयडॉलमध्ये उचलला सिलिंडर
sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोरोनाला कशाप्रकारे सामोरं जावं असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. कोरोनाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. आतापर्यत चित्रपट आणि मालिकेतील वेगवेगळ्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील परिस्थिती बिकट आहे. इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमाचे पुढील भागाचे चित्रिकरण झाले आहे. कोरोनामुळे चित्रिकरण लांबु नये हा त्यामागील उद्देश आहे. इंडियन आयडॉल 12 च्या मेकर्सनं काही एपिसोड शुट केले आहेत. या कार्यक्रमामध्ये नवनवीन सेलिब्रेटी सहभागी होत असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये बाबा रामदेव यांनी हजेरी लावली होती. हा भाग ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आले.

बाबा रामदेव यांच्या अचाट शक्तीचा यावेळी प्रेक्षकांना प्रत्यय आला आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही ट्रीक सांगितल्या. कोरोनाच्या दरम्यान काळजी घेण्याचे आवाहनही बाबांनी चाहत्यांना केले. बाबांनी याप्रसंगी असे काही केले की त्यामुळे त्या कार्यक्रमाचा होस्ट असणारा जय भानुशाली अवाक झाला. इंडियन आयडॉल 12 च्या सेटवरील बाबा रामदेव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावेळी ते जय भानुशाली याच्यासोबत मस्ती करताना दिसून आले. याचा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीनं आपल्या सोशल मीडिय़ाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

बाबा रामदेव यांनी हातात सिलेंडर घेतल्याचे दिसून आले आहे. याप्रसंगी जय भानुशाली बाबा रामदेव यांच्याजवळ बसल्याचे दिसून आले आहे. हा फोटो व्हायरल करताना विरल भयानीनं त्या फोटोंना कॅप्शनही दिलं आहे. त्यानं लिहिलं आहे, बाबा रे बाबा. त्या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंटही केल्या आहेत. अर्थात अशा प्रकारचा स्टंट बाबांनी काही पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शक्तिप्रदर्शन करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या योगाच्या प्रात्यक्षिकांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

रामदेव बाबांनंतर या मालिकेत आता अभिनेत्री जया प्रदा यांचीही एंट्री होणार आहे. यावेळी सर्व स्पर्धक जया प्रदा यांच्या चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत. बाबा रामदेव आणि जया प्रदा हे दोघेही स्पर्धकांचा उत्साह वाढवताना दिसणार आहेत. इंडियन आयडॉलच्या 12 व्या सीझनमध्ये गायिका नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी जज म्हणून काम पाहणार आहेत. आतापर्यत या कार्यक्रमांमध्ये नीतु कपूर, जितेंद्र, एकता कपूर आणि ए आर रेहमान आले आहेत.