रामदेव बाबा की जय हो! हत्तीवर बसून योगा करताना पडले; फराह खान म्हणते...

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

रामदेव बाबांच्या हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बाबा हत्तीवरुन योगा करताना खाली पडल्यानंतर त्यांच्यावर कमेंटसचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले.

मुंबई - आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रामदेव बाबा आता त्यांच्या योगामुळे हायलाईट झाले आहेत. बाबांसाठीचा तो दिवस भलताच ''योगायोगाचा'' ठरला. त्यांना अचानक हत्तीवर योगा करण्याची हुक्की आली. बाबांनी हत्तीवर बसून योगा सुरु केला. हत्तीवर प्रमाणापेक्षा जास्तच अवलंबून असलेल्या बाबांना हत्तीच्या लहरी स्वभावाची कल्पना यायला वेळ गेला. मात्र तोपर्यंत रामदेव बाबा हत्तीवरुन खाली पडले होते.  पडल्यानंतर तात्काळ उठून ते चालायलाही लागले होते.

रामदेव बाबांच्या हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बाबा हत्तीवरुन योगा करताना खाली पडल्यानंतर त्यांच्यावर कमेंटसचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले. यासंदर्भातला त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे. रामदेवबाबा खाली पडले पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांच्या या लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने रामदेव बाबांविषयी काळजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली,  “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.

22 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनातले एक आसन शिकवत होते . हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनं करत असताना अचानक हत्ती हलला. त्यामुळे रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पडल्यानंतर काही लोक हसले त्याचा आवाजही व्हिडीओत आहे.  या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी योगासनांमुळे काय काय फायदे होतात? याची माहिती दिली. तसंच अनुलोम व विलोम आणि इतर योगांविषयीही माहिती दिली. योग केल्याने कठीणातले कठीण आजार नाहीसे होतात. लोकांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी योगासनं करायला हवीत असंही वक्तव्य त्यांनी केलं.

यासगळ्य़ावर मात्र बाबांवर सोशल मीडियातून खिल्ली उडविणा-या पोस्ट व्हायरल होत आहे. बाबांना हत्तीवरच बसून योगा का करायचा होता, त्यातून त्यांना काय साध्य करायचे होते. अशी टिप्पणी एकाने केली आहे. 51 कोटी चौरस किलोमीटर जागा आपल्या पृथ्वीवर असताना बाबांना हत्तीवर बसूनच का योगा करायचा होता. यातून असे दिसून येते की, योगा करुन आपल्या मेंदूची वाढ होत नाही. या शब्दांत एका नेटक-याने रामदेव बाबांची खिल्ली उडवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Ramdev video of Elephant Yoga viral