संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'

मंगळवार, 27 मार्च 2018

सिनेमा सुपरहिट करण्यासाठी पडद्यावर ग्लॅमरची गरज नसते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'बबन' या सिनेमाने सिद्ध करून दाखविले आहे.

सिनेमा सुपरहिट करण्यासाठी पडद्यावर ग्लॅमरची गरज नसते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'बबन' या सिनेमाने सिद्ध करून दाखविले आहे.

भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील नायकाचा संघर्ष, आणि त्याची महत्वाकांक्षीवृत्ती प्रेक्षकांना भावली असल्यामुळे, सिनेमातील हा 'बबन' सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा 'ख्वाडा' च्या घवघवीत यशानंतर भाऊरावांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमादेखील त्याच उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'ख्वाडा' चा रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेच्या नैसर्गिक अभिनयामुळे 'बबन'च्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आला आहे. शिवाय गायत्री जाधव तसेच सिनेमातील इतर कलाकारांची भूमिका देखील वाखाणन्याजोगी आहे.

अल्पावधीतच लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या 'बबन'ला मोठी मागणी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात या सिनेमाच्या शो ची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई बाहेरील सिनेमागृहात 'बबन' सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पाटी झळकताना दिसून येत  आहे.

Web Title: baban marathi movie good collection in three days