'बाबांची शाळा' पडद्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत असलेला "बाबांची शाळा' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर हा स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी (ता. 5) दुपारी 1 वाजता आणि रात्री 8.30 वाजता प्रसारित होणार आहे. 

एखाद्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा ही केवळ त्याच्यापुरतीच राहत नाही, तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते. रागाच्या भरात हातून गंभीर गुन्हा घडल्यानंतर महिपत घोरपडेला न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते, अशी या चित्रपटाची कथा आहे. महिपत संकटावर कशी मात करतो आणि आपल्या लहान मुलीबरोबरचे भावनिक नाते कसे जपतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

Web Title: Babanchi shala marathi movie now on TV

टॅग्स