नाट्य, चित्रपटसृष्टीतील अनेक कामगारांची मदतीसाठी आर्त हाक

रोजगार कधी सुरू होणार या विवंचनेत कामगार
Theatre
Theatre

कोरोना महामारीचा Pandemic फटका अन्य क्षेत्राप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे Cinema Halls तसेच नाट्यगृहे Theatres बंद आहेत. तसेच महाराष्ट्रातील चित्रपटांचे चित्रीकरण सध्या बंद आहे. त्यातच आता लॉकडाऊन Lockdown वाढल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची रोजीरोटीच बुडाली असून अत्यंत दयनीय अवस्थेत त्यांना जीवन जगावे लागत आहे. काही संघटना किंवा संस्था त्यांना मदत करीत असल्या तरी आपला रोजगार कधी सुरू होणार या विवंचनेत अनेक कामगार आहेत. आता लॉकडाऊन वाढल्यामुळे त्यांचे कंबरडेच मोडले आहे. (backstage artists and workers asking for help in lockdown)

याबाबत शिवाजी मंदिर येथील बाळू चहावाला म्हणाला की, "मला काही कलाकार आणि निर्मात्यांनी मदतीचा हात दिला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. परंतु आता लवकरच नाट्यगृहे सुरू व्हावीत आणि आमचा रोजगार सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे. रोजगार सुरू झाला तरच आम्ही जगणार आहोत." नाट्य व्यवस्थापक संघाचे सचिव हरी पाटणकर म्हणाले की, "लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आले आणि पोटात भीतीचा गोळा आला आहे. मध्यंतरी सरकारने नाट्यगृहे कमी लोकांच्या उपस्थितीत चालविण्यास परवानगी दिली तेव्हा जीवात जीव आला होता. परंतु आता सगळेच ठप्प झाल्यामुळे जीव जाण्याची पाळी आली आहे. आम्हाला तत्काळ मदतीची गरज आहे."

Theatre
'शो मस्ट गो ऑन'; पायाला गंभीर दुखापत असतानाही संकर्षणने पूर्ण केलं नाटक

चित्रपट प्रॉडक्शन मॅनेजर राजू झेंडेने सांगितले की, "माझ्या कमाईवर सहा ते सात जणांचे कुटुंब आहे. गेले वर्षभर काहीच काम नसल्यामुळे हवालदिल झालो आहे. थोडे फार पैसे होते ते आतापर्यंत खर्च झाले आहेत. आता खूप हलाखीत जगावे लागत आहे. कुणी मदत करते आहे का याची वाट पाहात आहे. आपल्याच राज्यात नाही तर इतरही राज्यातील शूटिंग बंद आहे. कधी सुरू होणार आमचा व्यवसाय हाच विचार करीत आहे."

चित्रपट आणि नाट्यव्यवसायामध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचारी-कामगार यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. गेली कित्येक वर्षे हे कामगार या व्यवसायात काम करीत आहेत. या व्यवसायात जो काही मिळणारा मेहनताना आहे, त्यावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहेत. या व्यवसायावर असलेले प्रेम आणि श्रद्धा यामुळेच ते दिवस आणि रात्र राब राब राबत आहेत. परंतु गेले वर्षभर कोरोनामुळे सगळेच ठप्प झाले आहे. त्यांची रोजीरोटी बुडाली असून कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

(संकलन- स्वाती वेमूल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com