Backstreet Boys Video: चालू परफॉर्मन्समध्ये गायकाने अंडरवेअर ... मुंबईत कॉन्सर्टला आलेल्या बॅकस्ट्रीट बॉईजची अश्लील कृती

'बॅक स्ट्रीट बॉईज' चा हा कॉन्सर्ट वादात सापडलाय
Backstreet Boys, Backstreet Boys consert, Backstreet Boys mumbai consert
Backstreet Boys, Backstreet Boys consert, Backstreet Boys mumbai consertSAKAL

Backstreet Boys Controversy News: अमेरिकन गायक, डान्सर आणि 'बॅक स्ट्रीट बॉईज' ग्रुपचा सदस्य मॅक्लीन वादात सापडला आहे. अलेक्झांडर जेम्स मॅक्लीन उर्फ ​​एजे मॅक्लीन नुकताच त्याच्या ग्रुपसोबत मुंबईत आला होता.

मुंबईत 'बॅक स्ट्रीट बॉईज' कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टला मलाईका अरोरा, श्रद्धा कपूर याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

पण 'बॅक स्ट्रीट बॉईज' चा हा कॉन्सर्ट वादात सापडलाय. एजे मॅक्लीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो जमावावर अंडरवेअर फेकताना दिसत आहे.

(Backstreet Boys Singer throw underwear during ongoing consert in mumbai)

Backstreet Boys, Backstreet Boys consert, Backstreet Boys mumbai consert
Kartik Aaryan च्या आईची कॅन्सर शी झुंज यशस्वी, अभिनेत्यानं पोस्ट शेयर करत सांगितलं...
Backstreet Boys, Backstreet Boys consert, Backstreet Boys mumbai consert
असत्याला सत्याने जिंकता येते.. राजेश्वरीने दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Rajeshwari Kharat

बॅकस्ट्रीट बॉईज ग्रुप गेल्या आठवड्यातच मुंबईत आला होता. भारतात पहिल्यांदाच त्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती.

या गटात निक कार्टर, हॉवी डोरो, एजे मॅक्लीन, ब्रायन लिट्रेल आणि केविन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

त्यांचा परफॉर्मन्स स्टेजवर झाला तेव्हा मोठी गर्दी पाहायला मिळाली. चाहते अक्षरशः वेडे झाले होते आणि बॅकस्ट्रीट बॉईज ग्रुपचा कॉन्सर्टचा आनंद घेत होते.

काय घडलं नेमकं?

बॅकस्ट्रीट बॉईज चा एक व्हिडिओ फॅन्सनी सोशल मीडियावर शेयर केलाय. जिथे बॅकस्ट्रीट बॉईज एका बॉक्स मध्ये कपडे बदलताना दिसतात.

दरम्यान कपडे बदलताना, एजे मॅक्लीन स्टेजच्या एका टोकाला येतो. त्याच्या हातात अंडरवेअर असते.

दरम्यान कॉन्सर्टला आलेल्या पब्लिक शोचा मजेत आनंद लुटत होते. त्यादरम्यान सिंगर एजे मॅक्लीनने आपली अंडरवेअर जमावाच्या दिशेने फेकली. या व्हिडिओत तो उपस्थित प्रेक्षकांची छेड काढताना दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बॅकस्ट्रीट बॉईज वर चहूबाजूंनी टिका होते. एजे मॅक्लीन सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. दरम्यान या कॉन्सर्टला बॉलिवुड सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित होते.

एजे मॅक्लीनचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी श्रद्धा कपूर, अरबाज खान, बेनी दयाल, जॅकलिन फर्नांडिस, नताशा दलाल, मनीष पॉल, करिश्मा मेहता, मलायका अरोरा, रोहन जोशी, प्रकृति, सुकृती कक्कर, मीजान जाफरी आणि सर्व स्टार्स मुंबई कॉन्सर्टमध्ये पोहोचले.

आता बॅकस्ट्रीट बॉईज वर याप्रकरणी कारवाई होणार का? याकडे सर्वाचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com