शाहरुख म्हणाला 'बदला' लूँगा अन् अमिताभ म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

या चित्रपटात कोर्टमरूम मध्ये रंगलेला ड्रामा परत एकदा नव्याने नवीन चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. हा नवीन चित्रपट म्हणजे 'बदला'.

मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...
 

 

या ट्विटवर महानायकही मागे हटले नाहीत, तर त्यांनीही दिले उत्तर ट्विट मधूनच...
 

पण हा ट्विट खेळ नेमका कशावरुन सुरु झाला? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. तर हा खराखुरा वाद नाही. तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन अभिनीत 2016 ला आलेला चित्रपट 'पिंक'ची पुनरावृत्ती होणार आहे. या चित्रपटात कोर्टमरूम मध्ये रंगलेला ड्रामा परत एकदा नव्याने नवीन चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. हा नवीन चित्रपट म्हणजे 'बदला'.

'बदला'चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही कलाकारांनी हे ट्विट केले आहे. अभिनेत्री विद्या बालन आणि तमिळ सुपरस्टार अजिथ यांच्यासोबत बोनी कपूरने सोशल थ्रिलरची पुनर्बांधणी केली आहे. 

या चित्रपटाचे सहाय्यक निर्मिती शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान करत आहेत. चित्रपट 8 मार्च ला प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Badla Film Trailer will be released tomorrow