'उरी' नंतर आता 'बालाकोट स्ट्राइक' मोठ्या पडद्यावर !

वृत्तसंस्था
शनिवार, 14 डिसेंबर 2019

भारतीय सैन्याची कामगिरी मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली ते 'उरी...द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटामधून. लवकरच आता 'बालाकोट स्ट्राइक' वर चित्रपट येणार आहे. 

मुंबई : भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणारे 'बॉर्डर', 'एलओसी...कारगील' असे काही चित्रपट आले आणि प्रेक्षकांनी त्यांचे चांगले स्वागत केले. जम्मू-काश्‍मीरमधील उरी येथे पहाटे अतिरेक्‍यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. त्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे भारतीय सैन्याने ठरविले आणि केवळ अकरा दिवसांतच भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला. या स्ट्राईकचं आणि भारतीय सैन्याची कामगिरी मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली ते 'उरी...द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटामधून. लवकरच आता 'बालाकोट स्ट्राइक' वर चित्रपट येणार आहे. 

दिग्दर्शक भूषण कपूर आणि संजय लीली भन्साळी दोघं एकत्र येऊन या चित्रटाचं निर्देशन करणार आहेत. तर,  'रॉक ऑन' या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर दिग्दर्शन करणार आहेत. अभिषेक चित्रपटाच्या स्क्रिप्टवरही स्वत: काम करणार आहेत. याची घोषणा ट्विटरवरुन भूषण कुमार यांनी केली. ट्विट करताना त्यांनी लिहिलं,'हिंमत, निश्चय आणि पराक्रमाची कथा आम्ही घेऊन येतोय. देशासाठी प्राण गमवलेल्या शुरवीर जवानांना श्रद्धांजली देणाऱ्या या चित्रपटाची घोषणा करताना अभिमान होत आहे.' तर ट्विटमध्ये '#2019बालाकोटएयरस्ट्राइक' असा हॅशटॅगही वापरला आहे. 

बालाकोट एअरस्ट्राइक 
भारतीय वायुसेनाने पुलावामावर झालेल्या आतंकी हल्ल्यात देशाचे 40 जवान मारले गेले. हा हल्ला 14 फेब्रुवारीला झाला. याचं सडेतोड उत्तर देत भारतीय सेनेने 26 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच बालाकोटमध्ये हवाई दलाने बॉम्बहल्ला करून 'जैश ए महंमद'चे प्रशिक्षण तळ उध्वस्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balakot airstrike the film going to appear on silver screen