Balasaheb Thackeray Jayanti: त्यावेळी बाळासाहेबांनी एकाच दणक्यात केलं बॉलीवूड गार .. पुढे सगळेच होते दबकून! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray Birthday  his bollywood connection and when he enters to interfere on film industry

Balasaheb Thackeray Jayanti: त्यावेळी बाळासाहेबांनी एकाच दणक्यात केलं बॉलीवूड गार .. पुढे सगळेच होते दबकून!

Balasaheb Thackeray Jayanti: शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांच्या कैक आठवणी प्रत्येकाच्या मनात तशाच आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा आणि प्रेम महाराष्ट्राला माहीतच आहे.

असंही एकही क्षेत्र नाही ज्यासाठी बाळासाहेब धावून गेले नाहीत. त्यातही त्यांचा मनोरंजन विश्वाशी अगदीच जवळून संबंध आला. किंबहुना ते मनोरंजन विश्वाचेच झाले, त्याचीच ही गोष्ट.. (Balasaheb Thackeray Birthday his bollywood connection and when he enters to interfere on film industry )

बाळासाहेब ठाकरे म्हणजे उत्तम कलाकार, ते स्वतः व्यंगचित्रकार होते. शिवाय कलाकाराची दृष्टी त्यांच्याकडे होती. संगीत कलेवर त्यांचे विशेष प्रेम होते, शिवाय प्रबोधनकारांचा वारसा त्यांना लाभला होता. त्यामुळे कलाप्रेमी बाळासाहेब सर्वांनीच पाहिले, पण बाळासाहेब मनोरंजन विश्वाच्या कसे जवळ आले याचाही एक किस्साच आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

तशी याची सुरवात बाळसाहेबांचे वडील म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून झाली. प्रबोधनकारांनी आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची आई' सिनेमात काम केलं होतं. तसंच, महात्मा फुलेंवरील सिनेमात प्रबोधनकार ठाकरेंनी कर्मठ ब्राह्मणाची भूमिका केली होती. प्रबोधनकार स्वत: ब्राह्मणेतर चळवळीतले होते. त्यामुळे त्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती.

बाळासाहेबांनी कधी चित्रपटात किंवा नाटकात काम केले नाही पण पुढे असे काही काढले की त्यांना त्यांचा वरदहस्त या क्षेत्रावर ठेवावाच लागला. झाले असे की, शिवसेनेची स्थापना होऊन चार वर्षं झाली होती. मराठीचा मुद्दा घेत शिवसेना विविध क्षेत्रात शिरकाव करत होती, तिथले प्रश्न उचलून त्यावर न्याय मागत होती. मात्र, सिनेक्षेत्राकडे शिवसेना वळली नव्हती.

पण 1971 मध्ये तो दिवस आलाच, यावेळी दादा कोंडके यांचा 'सोंगाड्या' प्रदर्शित झाला आणि तुफान चालू लागला. 'सोंगाड्या'च्या प्रदर्शनावेळीही प्रचंड वाद झाला होतं आणि कारण होतं अभिनेते देवानंद यांच्या 'तेरे मेरे सपने'चं. देव आनंद यांचा हा सिनेमाही नेमका त्याचवेळी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे मुंबईतल्या दादरमधल्या कोहिनूर थिएटरने दादा कोंडकेंचा 'सोंगाड्या' सिनेमा लावायला नकार दिला.

दादांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदतीची विनंती केली. मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून शिवसेनेनेही थिएटर मालकाविरुद्ध दादांची बाजू घेतली. बाळासाहेबांनी यात स्वतः लक्ष घातलं आणि सगळे शिवसैनिक त्यात सहभागी झाले. हा चित्रपट थिएटरमध्ये लागावा यासाठी मोठं आंदोलन झालं.

सेनेच्या आंदोलनामुळे अखेर थिएटर मालकाला ऐकावं लागलं आणि 'सोंगाड्या' कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भरपूर चालला.

दादांच्या स्टारडममध्ये बाळासाहेबांकडून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मौल्यवान मदतीचा मोठा हात होता. या घटनेमुळे बाळासाहेबांना बॉलीवुडमध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि पुढे काही घटनांमुळे बॉलीवुडकरांचे ते मसीहाच बनले.