Aroh Welankar: बाळासाहेब पण खुश असतील.. शिंदेंचं अभिनंदन करताना आरोहचा ठाकरेंना टोमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde, Uddav Thackeray, shivsena

Aroh Welankar: बाळासाहेब पण खुश असतील.. शिंदेंचं अभिनंदन करताना आरोहचा ठाकरेंना टोमणा

Eknath Shinde - Uddav Thackeray: निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला काल मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनेक स्तरांमधून प्रतिक्रिया आहेत.

अशातच बिग बॉस फेम अभिनेता आरोह वेलणकरने एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये आरोहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलंय याशिवाय उद्धव ठाकरेंना टोमणा मारलाय.

निवडणूक आयोगाने दिलेल्या ऐतिहासिक निकालावर आरोहने ट्विट करून लिहिलंय कि.. "Congratulations एकनाथ शिंदे !! बाळासाहेब पण खूष असतील आज..." असं ट्विट करून आरोहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलंय.

तर उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोमणा मारलाय. आरोहचं हे ट्विट अल्पावधीतच व्हायरल झालंय. नेटकऱ्यांनी या ट्विटखाली चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरे आणि शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरु आहे. पक्ष चिन्ह, पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला. अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे.

शेवटी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत नवं सरकार स्थापन केले.

सध्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.

आरोह वेलणकर बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी होता. या सिझनमध्ये आरोहने टॉप ६ पर्यंत मजल मारली होती. याशिवाय नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठी ४ मध्ये आरोह चॅलेंजर म्हणून सहभागी झालेला. याही सिझनमध्ये आरोह टॉप ६ होता.

आरोहच्या फनरल सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कर मिळाला. आरोह कायम त्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर करत असलेल्या पोस्ट्स मुळे चर्चेत असतो.