esakal | रिक्षाचालकाचा लावणीवर जबरी डान्स, व्हिडिओ व्हायरल

बोलून बातमी शोधा

baramatikar auto rikshaw driver dance on marathi lavani aata vajali ki bara }

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यातून काही टॅलेंट समोर येताना दिसत आहे. 

रिक्षाचालकाचा लावणीवर जबरी डान्स, व्हिडिओ व्हायरल
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  लावणी हा काय फक्त स्त्रियांनी सादर करायचा प्रकार आहे अशी आपली आतापर्यतची समजूत होती. मात्र बारामतीतल्या एका कलाकारानं तो समज चूकीचा ठरवला आहे. त्याचा लावणीवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तो अवघ्या काही तासांत देशातल्या कानाकोप-यात पोहचला आहे. मला जाऊ द्या घरी वाजले की बारा या लावणीवर त्यानं केलेलं नृत्य कमालीचं सुंदर झाले आहे. सोशल मीडियावरुन त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी त्याला कमेंटस देऊन त्या कलाकाराचा उत्साह वाढवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यातून काही टॅलेंट समोर येताना दिसत आहे. तुम्हाला आठवत असेल नवरदेवासमोर नाच रे मोरा या गाण्यावर नृत्य करणारा मुलगा, तसेच एका आजीनं वराती दिलेर मेहंदीच्या गाण्यावर केलेला डान्स सुपरहिट झाला होता. आताही असाच एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. त्यातील कलाकारानं ज्याप्रकारे आपली कला सादर केली आहे ते पाहून लावणी पुरुषही चांगल्याप्रकारे करु शकतात. असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

याविषयी एका वेबपोर्टलवर प्रसिध्द झालेल्या माहितीनुसार  हा लावणी नृत्य सादर करणारा कलाकार, बारामती शहराजवळील गुणवडी गावाचा आहे. तसेच तो विद्यमान ग्रामपंचायत सदस्यही आहे. त्याचे नाव  बाबा कांबळे  असून तो रिक्षाचा व्यवसाय करतो. मात्र त्यांना नृत्याची आवड आहे.  सोशल मीडियातून बाबाच्या या व्हिडिओला चांगली प्रसिध्दी मिळाली आहे. त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट समोर येताना दिसते आहे. त्याला मिळणा-या प्रसिध्दीमुळे अनेकांना त्यातून प्रेरणाही मिळाल्याची उदाहरणेही आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणाम एवढा प्रचंड आहे की त्यामुळे त्या संबंधित कलाकाराला प्रतिसादही थेट मिळतो. बाबा मात्र या व्हिडिओमुळे प्रसिध्द झाला आहे एवढे मात्र नक्की.